32 C
Mumbai
Sunday, November 22, 2026
घरदेश दुनियामेक्सिकोमध्ये मोस्ट वाँटेड ड्रग्स तस्कराच्या अटकेनंतर हिंसाचाराचा भडका

मेक्सिकोमध्ये मोस्ट वाँटेड ड्रग्स तस्कराच्या अटकेनंतर हिंसाचाराचा भडका

रस्त्यांवर गोळीबार आणि जाळपोळ

Google News Follow

अमेरिकेचा शेजारी देश असलेल्या मेक्सिकोमध्ये कुख्यात ड्रग्स तस्कराला अटक केल्यानंतर हिंसाचाराचा मोठा उद्रेक झाला आहे. एफबीआयच्या १० मोस्ट वाँटेड फरार आरोपींच्या यादीत समावेश असलेला ४४ वर्षीय फॉस्टो इसिड्रो मेसा फ्लोरेस उर्फ ‘एल चापो इसिड्रो’ याला अटक करण्यात आली. या कारवाईनंतर मेक्सिकोच्या सिनालोआ राज्यात ड्रग्स कार्टेलच्या सदस्यांनी हिंसक प्रतिक्रिया दिली. अनेक ठिकाणी गोळीबार, वाहनांची जाळपोळ आणि महामार्ग रोखण्याचे प्रकार घडले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मेसा फ्लोरेस याला त्याच्या टोळीतील दोन वरिष्ठ सदस्यांसह अटक करण्यात आली. मेक्सिकन लष्कर, नॅशनल गार्डचे विशेष पथक आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. मात्र, आपल्या प्रमुखाला अटक झाल्यानंतर ड्रग्स कार्टेलच्या सदस्यांनी सुरक्षा दलांवर हल्ले सुरू केले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि तस्करांमध्ये जोरदार चकमकी झाल्या. या हिंसाचाराची व्याप्ती वाढत जाऊन घनदाट लोकवस्तीच्या भागांसह प्रमुख महामार्गांवरही त्याचे पडसाद उमटले.
हे ही वाचा:
कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे ७०० धावांचे पंचक

भारताने ७२० धावांचा डोंगर उभारून न्यूझीलंडविरुद्ध घेतली पकड

स्पाइसजेटची विमानसेवा विस्कळीत असतानाही तिकीट विक्री सुरूच

पुणे-लोणावळ्यातील १४ हॉटेल्ससह दोन डार्क स्टोअरवर एफडीएचा बडगा

दरम्यान, या संघर्षात लष्करी हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडीओमध्ये मेक्सिकोची दोन लष्करी हेलिकॉप्टर्स जमिनीच्या दिशेने गोळीबार करताना दिसत आहेत. ड्रग्स कार्टेलचे संशयित सदस्य आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या चकमकीदरम्यान हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून कारवाई करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. दुसरीकडे, हिंसक जमावाने अनेक रस्ते अडवल्याने वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली.

या घटनेमुळे सिनालोआ राज्यातील सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. ड्रग्स कार्टेलची संघटित ताकद आणि त्यांच्या हिंसक कारवायांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तस्कराच्या अटकेनंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे प्रशासनाने सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांचे प्रयत्न सुरू असून या घटनेमुळे मेक्सिकोतील ड्रग्स तस्करीविरोधातील मोहिमेचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा