33 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरक्राईमनामागोध्रा ट्रेन हत्या कांडातील दोषीला वैद्यकीय जामीन

गोध्रा ट्रेन हत्या कांडातील दोषीला वैद्यकीय जामीन

हृदयविकाराच्या गंभीर समस्येमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

Google News Follow

२००२ मधील गोध्रा ट्रेन हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या इरफान सिराज पाडो याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला. हृदयविकाराच्या गंभीर समस्येने त्रस्त असलेल्या पाडोने जवळपास १८ वर्षे कारागृहात काढली आहेत. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने त्याची शिक्षा स्थगित करण्याचा आदेश दिला.

पाडो याने दोषसिद्धीविरोधातील अपील प्रलंबित असताना शिक्षेला स्थगिती देऊन जामीन मिळावा, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्याचे अपील २०१८ पासून न्यायालयात प्रलंबित आहे. सुनावणीदरम्यान गुजरात सरकारनेही त्याची हृदयविकारासंबंधीची वैद्यकीय स्थिती योग्य असल्याचे मान्य केले. त्यामुळे न्यायालयाने वैद्यकीय कारणांचा विचार करून त्याला दिलासा दिला.

मात्र, गुजरात सरकारने जामिनाला विरोध करताना हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगितले. कारागृहातील त्याचे वर्तन समाधानकारक नसल्याचा तसेच २०१९ मध्ये पॅरोलवर सुटल्यानंतर निर्धारित मुदतीत परत न आल्याने तो ३७२ दिवस फरार राहिल्याचा मुद्दाही सरकारने मांडला होता. मात्र, त्याची वैद्यकीय स्थिती सरकारने मान्य केली.

हे ही वाचा:

भारताकडून नेपाळला २४ हजार कोटींचे विकास पॅकेज

मानहानी प्रकरणात ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वे; ‘शरयू-कमला एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा

पंतप्रधान मोदींकडून त्रिवेणीचे जल, तर शाह यांच्याकडून रुद्राक्ष भेट

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्याला आग लावण्यात आली होती. या घटनेत ५९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या. मार्च २०११ मध्ये विशेष न्यायालयाने या प्रकरणात ३१ जणांना दोषी ठरवले होते. त्यापैकी ११ जणांना फाशी, तर २० जणांना जन्मठेप सुनावली होती. ऑक्टोबर २०१७ मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने दोषसिद्धी कायम ठेवत ११ जणांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. या दोषींनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, त्यावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा