33 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरविशेषभारताकडून नेपाळला २४ हजार कोटींचे विकास पॅकेज

भारताकडून नेपाळला २४ हजार कोटींचे विकास पॅकेज

आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

Google News Follow

भारत आणि नेपाळमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक व्यापक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी विविध क्षेत्रांतील आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच पूरग्रस्त नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी भारताकडून २४ हजार कोटी नेपाळी रुपयांचे विकास सहकार्य पॅकेज जाहीर करण्यात आले. शिक्षण, तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी नेपाळमध्ये आयआयटीचे परदेशी केंद्र, स्टार्टअप इनक्युबेटर आणि इनोव्हेशन हब स्थापन करण्याची घोषणाही पंतप्रधान मोदी यांनी केली.

बालेन्द्र शाह यांचा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच द्विपक्षीय भारत दौरा होता. हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी शाह यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. नेपाळच्या जनतेने त्यांना दिलेला जनादेश हा तेथील तरुण पिढीच्या अपेक्षा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे मोदी म्हणाले. भारत हा नेपाळच्या विकासप्रवासातील विश्वासार्ह भागीदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑगस्टमध्ये नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांचे जीवन पूर्वपदावर आणणे, पुनर्बांधणीला गती देणे आणि भविष्यातील आपत्तींचा सामना करण्याची नेपाळची क्षमता वाढवणे, हा या आर्थिक पॅकेजचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांदरम्यान झालेले आठ करार अंतराळ तंत्रज्ञान, उपग्रह संचार, सुरक्षा प्रशिक्षण, न्यायवैद्यक विज्ञान, प्रशासकीय क्षमता, आरोग्य, आयुर्वेद, शाश्वत शहरी विकास आणि पशुधन व मत्स्यव्यवसाय या क्षेत्रांशी संबंधित आहेत. यामुळे सरकारी संस्था, आरोग्य व्यवस्था आणि तांत्रिक सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

मानहानी प्रकरणात ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वे; ‘शरयू-कमला एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा

पंतप्रधान मोदींकडून त्रिवेणीचे जल, तर शाह यांच्याकडून रुद्राक्ष भेट

दीपस्तंभावर दिवा लावण्याच्या विरोधात विजय सरकार

नेपाळमधील तरुणांसाठी आयआयटीचे परदेशी केंद्र उभारण्याबरोबरच स्टार्टअप इनक्युबेटर आणि इनोव्हेशन हब सुरू केले जाणार आहेत. भारतीय शिक्षणसंस्थांमध्ये नेपाळी विद्यार्थ्यांसाठी कायदा आणि तंत्रज्ञान विषयातील शिष्यवृत्तीच्या संधीही वाढवण्यात येणार आहेत. याशिवाय नेपाळमध्ये कृषी-औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी सहकार्य करण्याची घोषणा मोदी यांनी केली. या निर्णयांमुळे भारत-नेपाळ संबंधांना केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक पातळीवरच नव्हे, तर आर्थिक विकास, शिक्षण, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा