33 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरदेश दुनियायुक्रेनने लिबियाच्या बंदरात रशियन युद्धनौका बुडवली

युक्रेनने लिबियाच्या बंदरात रशियन युद्धनौका बुडवली

सागरी ड्रोनच्या मदतीने ‘मर्क्युरी’वर हल्ला

Google News Follow

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता नव्या टप्प्यावर पोहोचले आहे. युक्रेनने रशियाच्या हद्दीपासून तब्बल १,८०० किलोमीटर दूर असलेल्या लिबियातील बेनगाझी बंदरात रशियन नौदलाच्या ‘मर्क्युरी’ या युद्धनौकेवर सागरी ड्रोनच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात युद्धनौका बुडाल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. या कारवाईत जहाजावरील रशियन लष्करी हेलिकॉप्टरही नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

झेलेन्स्की यांनी सोमवारी सोशल मीडियावर या कारवाईचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यांच्या माहितीनुसार, युक्रेनने सात मानवरहित सागरी ड्रोनच्या मदतीने ही कारवाई केली. २२ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा हे ड्रोन लिबियाच्या किनाऱ्याजवळ पोहोचले. त्यानंतर बेनगाझी बंदरात उभ्या असलेल्या रशियन युद्धनौकेला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात ‘मर्क्युरी’ युद्धनौकेसह त्यावरील ‘Ka-27’ प्रकारचे लष्करी हेलिकॉप्टर नष्ट झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

‘मर्क्युरी’ ही रशियाच्या आधुनिक नौदलातील कॉर्व्हेट प्रकारची युद्धनौका आहे. तिची लांबी सुमारे ३४४ फूट असून २०२३ मध्ये ती रशियन नौदलात दाखल झाली होती. ही युद्धनौका रशियाला परत जात असताना इंधन आणि रसद भरण्यासाठी बेनगाझी बंदरात थांबली होती. उपग्रह छायाचित्रांमध्ये हल्ल्यानंतर जहाजाचा मोठा भाग पाण्यात बुडाल्याचे दिसत आहे. मात्र, जहाज पूर्णपणे निकामी झाले आहे की दुरुस्तीनंतर पुन्हा सेवेत आणता येईल, याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही.

या कारवाईत युक्रेनने रशियाच्या ‘एमव्ही अंगारा’ या मालवाहू जहाजालाही लक्ष्य केल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला. रशिया या जहाजाचा वापर शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीसाठी करत असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. या जहाजाला लक्ष्य करण्यात आले असले तरी त्याच्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध नाही.

हे ही वाचा:

पश्चिम बंगालच्या नामांतरासाठी सरकारची तयारी

गोध्रा ट्रेन हत्या कांडातील दोषीला वैद्यकीय जामीन

भारताकडून नेपाळला २४ हजार कोटींचे विकास पॅकेज

मानहानी प्रकरणात ध्रुव राठीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

या हल्ल्यामुळे रशियाच्या नौदलाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, युक्रेनने आपल्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या भूमध्य समुद्रातील लक्ष्यावर सागरी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. रशिया-युक्रेन युद्धात यापूर्वीही युक्रेनने काळ्या समुद्रात रशियन युद्धनौका आणि नौदल तळांना लक्ष्य केले आहे. २०२२ मध्ये ‘मॉस्क्वा’ या रशियन युद्धनौकेलाही युक्रेनने क्षेपणास्त्र हल्ल्यात बुडवले होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा