33 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरक्राईमनामापुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून सोनियांना कायदेशीर नोटीस

पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून सोनियांना कायदेशीर नोटीस

बिनशर्त माफी मागण्याची मागणी

Google News Follow

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या नव्या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयीच्या उल्लेखांवरून वाद निर्माण झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सत्यकी सावरकर यांनी सोनिया गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘Belonging: A Journey of Love’ या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची विधाने ऐतिहासिकदृष्ट्या चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे. या विधानांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा आणि वारसा यांना धक्का पोहोचत असल्याचा दावाही नोटिशीत करण्यात आला आहे.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या २०१ व्या पानावर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांकडे दयेचे अर्ज केले होते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही सदस्य ब्रिटिशांसाठी खबरे म्हणून काम करत होते, असा उल्लेख आहे. या विधानांमुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांना स्वातंत्र्यसैनिकांची माहिती दिली किंवा त्यांच्याशी सहकार्य केले, असा अर्थ निघत असल्याचे सत्यकी सावरकर यांनी म्हटले आहे.

तसेच, पुस्तकाच्या ४४३ व्या पानावर सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा उल्लेख करताना भारत हा हिंदूंचे वर्चस्व असलेला देश असावा, अशी त्यांची भूमिका असल्याचे म्हटले आहे. या विचारसरणीचा संबंध आरएसएस, भाजप आणि संघ परिवाराशी जोडण्यात आला आहे. हे वर्णन सावरकरांच्या राजकीय आणि वैचारिक भूमिकेचे चुकीचे चित्रण करत असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे.

हे ही वाचा:

पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीरवर चिनी उपग्रहांची नजर?

मेरठमधून दहशतवादी कनेक्शन असलेल्या उजैदला अटक

हिजाबशिवाय गाणे म्हणणाऱ्या गायिकेला इराणमध्ये चाबकाचे फटके

लंडनसाठी निघालेल्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर रोखले

सत्यकी सावरकर यांनी वकील संग्राम कोल्हटकर यांच्यामार्फत ही नोटीस पाठवली आहे. सोनिया गांधी यांनी १५ दिवसांत बिनशर्त लेखी माफी मागावी, सार्वजनिक स्पष्टीकरण द्यावे आणि संबंधित विधानांना आधार देणारे ऐतिहासिक पुरावे सादर करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, वादग्रस्त उल्लेख पुस्तकाच्या पुढील आवृत्त्या, पुनर्मुद्रण आणि डिजिटल आवृत्त्यांमधून दुरुस्त करावेत किंवा वगळावेत, अशी मागणी प्रकाशकाकडेही करण्यात आली आहे. मागण्या मान्य न केल्यास न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा