30 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरविशेषलंडनसाठी निघालेल्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर रोखले

लंडनसाठी निघालेल्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर रोखले

पासपोर्ट फ्लॅग केल्याचा दावा

Google News Follow

कॉकक्रोच जनता पार्टीचे (CJP) सहसंयोजक सौरव दास याला लंडनला जाण्यापासून दिल्ली विमानतळावर रोखण्यात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो लंडनला जाणार होता. मात्र, विमानतळावरील इमिग्रेशन तपासणीदरम्यान त्याचा पासपोर्ट फ्लॅग करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आणि त्याला विमानात बसू दिले नाही, असे दास याने म्हटले आहे. या घटनेनंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केली.

सौरव दास याचे लंडनला जाणारे विमान सोमवारी रात्री उशिरा म्हणजेच मंगळवारी पहाटे एक वाजता रवाना होणार होते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनने त्याला ‘कॉकरोच मूव्हमेंट’ या विषयावरील चर्चासत्रासाठी आमंत्रित केले होते. याशिवाय केंब्रिज विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) आणि एडिनबरा विद्यापीठातही व्याख्यानांसाठी निमंत्रण मिळाल्याचे त्याने सांगितले.

हे ही वाचा:

१६ डिसेंबरला बांगलादेशात जाण्याची हसीनांची घोषणा

कुर्ला प्रकरणात मारहाण करणाऱ्या मुलांशी संबंधित मदरशाला नोटीस

जेनसन हुआंग यांचे एनव्हिडियामध्ये पुनरागमन

दादरमध्ये फेरीवाल्यांचे ‘हप्ताराज’; क्यूआर कोडचा काळाबाजार!

दिल्ली विमानतळावर त्याला रोखल्यानंतर दास याने ‘एक्स’वर पोस्ट करत, मोदी सरकारने आपल्याला लंडनला जाण्यापासून रोखल्याचा आरोप केला. सरकारला सुशिक्षित तरुणांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जाऊन विचार मांडणे सहन होत नसल्याची टीकाही त्याने केली. तसेच नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्यासारखे हजारो कोटी रुपये लुटले असते, तर कदाचित आपल्याला परदेशात जाण्यापासून रोखले गेले नसते, असे उपरोधिक विधानही त्यांनी केले. दरम्यान, अभिजित दिपके यानेही या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला. ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून निमंत्रण मिळाल्यामुळे सत्तेतील कोणीतरी नाराज असल्याचा आरोप त्याने केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा