33 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरक्राईमनामाकुर्ला प्रकरणात मारहाण करणाऱ्या मुलांशी संबंधित मदरशाला नोटीस

कुर्ला प्रकरणात मारहाण करणाऱ्या मुलांशी संबंधित मदरशाला नोटीस

अनधिकृत बांधकामाची तपासणी करणार

Google News Follow

मुंबईतील कुर्ला येथील फिनिक्स मॉलजवळील उद्यानात तरुण सौरभ आणि नेहा यांना आठ अल्पवयीन मुलांनी मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर आता संबंधित मदरशावरही महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. या मुलांचा संबंध असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या घाटकोपरमधील मदरशाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल वॉर्ड कार्यालयाने नोटीस बजावली आहे. मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम ४८८ अंतर्गत ही नोटीस जारी करण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोशल मीडियावर नोटीस प्रसिद्ध करत याबाबत माहिती दिली.

महापालिकेने २३ नोव्हेंबर रोजी ही नोटीस जारी केली आहे. त्यानुसार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी किंवा त्यानंतरच्या कोणत्याही कामकाजाच्या दिवशी महापालिकेचे अधिकारी संबंधित जागेची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. यावेळी बांधकामाची प्रत्यक्ष मोजमापे घेऊन रचनेची तपासणी केली जाणार आहे. तसेच जागेच्या मालकाला किंवा ताबेदाराला बांधकामाचा मंजूर आराखडा, भोगवटा प्रमाणपत्र (OC) आणि बांधकाम अधिकृत असल्याचे सिद्ध करणारी इतर कागदपत्रे तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाहणीच्या वेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी घाटकोपर पोलिसांकडे पोलीस संरक्षणाची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी या मदरशाच्या अधिकृततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच उद्यानाच्या मागील बाजूची संरक्षक भिंत तोडून अनधिकृत प्रवेशद्वार तयार करण्यात आल्याचा आरोप करत त्याचीही चौकशी करण्याची मागणी केली होती.

हे ही वाचा:

जेनसन हुआंग यांचे एनव्हिडियामध्ये पुनरागमन

दादरमध्ये फेरीवाल्यांचे ‘हप्ताराज’; क्यूआर कोडचा काळाबाजार!

भाग रहेमान भाग…

ड्रॉचा भारताला मोठा फटका; WTC फायनलची वाट खडतर!

दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी प्रमोद महाजन उद्यानात फोटो काढत असलेल्या सौरभ आणि नेहा यांच्याशी काही मुलांचा वाद झाला. त्यानंतर आठ अल्पवयीन मुलांनी दोघांना घेरून लाठ्या-काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १२ ते १५ वयोगटातील ६ जणांना अटक करण्यात आली. तर, ८ ते १० वयोगटातील दोन मुले फरार होती. या दोघांना सोमवारी ताब्यात घेऊन बाल न्याय समिती समोर हजर करण्यात आले. या आठ ही जणांची दोन आठवड्यासाठी डोंगरीच्या बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा