30 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरबिजनेससप्लिमेंट्स बनवणाऱ्या ५ कंपन्यांना एफएसएसएआयचा दणका

सप्लिमेंट्स बनवणाऱ्या ५ कंपन्यांना एफएसएसएआयचा दणका

परवाने तात्काळ निलंबित

Google News Follow

आरोग्य चांगले राहावे, शरीराला आवश्यक पोषण मिळावे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी अनेकजण व्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि विविध हेल्थ सप्लिमेंट्सचा वापर करतात. मात्र, याच उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी न्यूट्रास्युटिकल्स आणि आरोग्यविषयक उत्पादने तयार करणाऱ्या पाच कंपन्यांचे परवाने निलंबित केले आहेत. वेदांत रेमेडीज, ल्युसिड हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, अॅम्बिको आयुर्वेदिक हेल्थकेअर, व्हिटामेडिक हेल्थ न्यूट्रास्युटिकल्स आणि अॅडोरियल हेल्थकेअर या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. २२ नोव्हेंबर रोजी एफएसएसएआयने यासंदर्भात माहिती दिली.

या कंपन्यांच्या उत्पादन केंद्रांमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत स्वच्छतेचा अभाव, पायाभूत सुविधांमधील त्रुटी आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. काही ठिकाणी उत्पादन प्रक्रियेत आवश्यक स्वच्छता पाळली जात नसल्याचे, तर काही ठिकाणी उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकांच्या साठवणुकीत अनियमितता असल्याचे निदर्शनास आले. मुदत संपलेल्या कच्च्या मालाचा वापर आणि आवश्यक नोंदींचा अभाव यांसारख्या बाबीही तपासणीदरम्यान समोर आल्या. त्यामुळे संबंधित कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा:
नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

रामायणावरून ‘महाभारत’ कशाला ?

मोदींना सोन्याच्या घसरगुंडीचा दृष्टांत झाला होता का?

दिल्ली पोलीस ठाण्यात नबीलने मारला नऊ कर्मचाऱ्यांना चाकू

विशेष म्हणजे, काही कंपन्यांच्या परवान्यांवर नमूद केलेली उत्पादन केंद्रे प्रत्यक्षात कार्यरत नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले. व्हिटामेडिक हेल्थ न्यूट्रास्युटिकल्सने परवान्यावर नोंद नसलेल्या दुसऱ्या ठिकाणी उत्पादन व्यवसाय सुरू केल्याचे आढळले. तर अॅडोरियल हेल्थकेअरच्या परवान्यावर नमूद असलेल्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. या प्रकारांमुळे परवाना आणि प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेतील विसंगती उघड झाली आहे.

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीलाही एफएसएसएआयने सहा न्यूट्रास्युटिकल्स उत्पादक कंपन्यांविरोधात कारवाई केली होती. त्यामध्ये अॅम्बिको आयुर्वेदिक हेल्थकेअर आणि वेदांत रेमेडीज यांचाही समावेश होता. आरोग्यविषयक उत्पादनांच्या बाजारपेठेत वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा प्राधिकरणाने तपासणी आणि कारवाईचा वेग वाढवला आहे. या कारवाईमुळे हेल्थ सप्लिमेंट्स उत्पादक कंपन्यांच्या गुणवत्ता नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, ग्राहकांनी अशी उत्पादने खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, घटक आणि अधिकृत परवाना तपासण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा