34 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरविशेषपासपोर्टमधील जन्मस्थळ माहितीबाबतच्या संशयामुळे सौरव दासला थांबवले?

पासपोर्टमधील जन्मस्थळ माहितीबाबतच्या संशयामुळे सौरव दासला थांबवले?

Google News Follow

कॉकक्रोच जनता पार्टीचे (CJP) सहसंयोजक सौरव दास याला लंडन दौऱ्यावर जाण्यापूर्वी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबविण्यात आले. त्यावरून सौरव दासने व्हीडिओ करत सरकारवर टीका केली मात्र त्याचा पासपोर्ट का जप्त करण्यात आला, त्याला लंडनला जाण्यापासून का थांबविण्यात आले, याविषयी नवनवी माहिती समोर येते आहे.

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात ‘कॉकक्रोच मूव्हमेंट’ या विषयावर भाषण देण्यासाठी आपण जाणार असल्याचे दासने म्हटले होते. लंडनला जाणाऱ्या रात्री एक वाजताच्या विमानात बसण्यापूर्वी दिल्ली विमानतळावरील इमिग्रेशन काउंटरवर त्यांना अडवण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट अलर्टवर असल्याची माहिती दिल्याचे दासने सांगितले.

सौरव दासच्या पासपोर्टमधील जन्मस्थळाच्या माहितीत विसंगती असल्यामुळे त्याला विमानतळावर रोखण्यात आले होते. सौरव दास यांच्या पासपोर्टमध्ये जन्मस्थळाबाबत चुकीची माहिती नमूद करण्यात आली होती. या प्रकरणी चेन्नई येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने (RPO) त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हे ही वाचा:

पेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड

तिरुपती बालाजीला १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण

प्रियांश आर्यची टी-२०मध्ये ऐतिहासिक १८१ धावांची खेळी

स्वयंपाकघरातील तेलाला महागाईचा ‘तडका’

दासला २३ नोव्हेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याला उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आपले उत्तर सादर करेपर्यंत पासपोर्टचा वापर करून प्रवास करू नये, असा सल्लाही त्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

चेन्नईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या या प्रक्रियेमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. उपलब्ध वृत्तानुसार, ही कारवाई पासपोर्टमध्ये नमूद केलेल्या जन्मस्थळाच्या तपशिलांशी संबंधित आहे. त्यामुळे केवळ ऑक्सफर्ड युनियनच्या कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी सरकारने अधिकृतपणे प्रवासबंदी घातली होती, असे म्हणता येत नाही.

सोमवारी रात्री ‘एक्स’वर केलेल्या पोस्टच्या मालिकेत दास याने ऑक्सफर्ड विद्यापीठासह प्रतिष्ठित संस्थांमधील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यापासून सरकार रोखत असल्याचा आरोप केला. मात्र, त्याच दिवशी कॉकक्रोच जनता पार्टीच्या कायदेशीर विभागाच्या प्रमुख रत्ना सिंह यांनी केलेल्या पोस्टमधून या कार्यक्रमाबाबत वेगळी माहिती समोर आली आहे. हा कार्यक्रम ऑक्सफर्ड विद्यापीठाने नव्हे, तर ऑक्सफर्ड युनियन या स्वतंत्र संस्थेने आयोजित केल्याचे त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट होते.

कॉकक्रोच जनता पार्टीच्या पॅनेलचा हा कार्यक्रम १ डिसेंबर रोजी ऑक्सफर्ड युनियनमध्ये आयोजित करण्यात येणार होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा