34 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरस्पोर्ट्सप्रियांश आर्यची टी-२०मध्ये ऐतिहासिक १८१ धावांची खेळी

प्रियांश आर्यची टी-२०मध्ये ऐतिहासिक १८१ धावांची खेळी

Google News Follow

दिल्लीचा युवा फलंदाज प्रियांश आर्य याने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. तामिळनाडूविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ६८ चेंडूंत १८१ धावांची वादळी खेळी साकारली. टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.

दिल्लीचा कर्णधार असलेल्या प्रियांशने अवघ्या ३६ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याच्या या आक्रमक खेळीत ७ चौकार आणि तब्बल १९ षटकारांचा समावेश होता. या खेळीसह त्याने केएल राहुलचा विक्रम मोडीत काढला. राहुलने आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना ६७ चेंडूंत १५२ धावा केल्या होत्या.

प्रियांशने १९ षटकार ठोकत एका टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. न्यूझीलंडच्या फिन अ‍ॅलनने २०२५ मध्ये मेजर लीग क्रिकेटमध्ये १९ षटकार मारण्याची कामगिरी केली होती. आता या विक्रमात प्रियांशनेही आपले नाव नोंदवले आहे.

हेही वाचा :

पुस्तकांचा खजिना वाचकांच्या भेटीला! मुंबई पुस्तक महोत्सवाला सुरुवात

भारताचा आर्थिक विकासदर सलग दोन वर्षे ७ टक्क्यांवर राहणार

स्वयंपाकघरातील तेलाला महागाईचा ‘तडका’

१६ डिसेंबरला बांगलादेशात जाण्याची हसीनांची घोषणा

विशेष म्हणजे, जागतिक टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येच्या यादीत प्रियांशची १८१ धावांची खेळी दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या लुआन-ड्रे प्रिटोरियसने नाबाद १८८ धावा करत सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम नोंदवला आहे.

प्रियांशच्या तुफानी खेळीच्या जोरावर दिल्लीने तामिळनाडूविरुद्ध ५ बाद २७५ धावांचा डोंगर उभारला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा