31 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरक्राईमनामासुरतमध्ये जळगावच्या पाटील कुटुंबाला कालव्यात फेकले

सुरतमध्ये जळगावच्या पाटील कुटुंबाला कालव्यात फेकले

तिघांचा मृत्यू, दोन मुले बेपत्ता

Google News Follow

गुजरातमधील सुरत जिल्ह्यात जळगावच्या पाटील कुटुंबासोबत घडलेल्या भीषण घटनेने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. कामानिमित्त सुरतकडे निघालेल्या एका कुटुंबातील सहा जणांना चार जणांनी गाडी अडवून कालव्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पती-पत्नीसह त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. तर १३ वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत मृत्यूच्या दाढेतून स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेमागे विमा घोटाळ्याचे कारण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील नितीन ऊर्फ भुरिया पाटील हे पत्नी कविता आणि चार मुलांसह कारने सुरतकडे जात होते. २१ नोव्हेंबर रोजी रात्री बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ चार जणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने बाहेर काढून उकाई कालव्यात फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत १३ वर्षीय करण पाटील याला पाण्यात एक पाइप मिळाला. त्याचा आधार घेत तो कालव्याबाहेर आला आणि जवळच्या पेट्रोल पंपावर पोहोचला. त्याने तेथील कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली.

हे ही वाचा:
हिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!

खासगी गुंतवणुकीत सहा महिन्यांत २६.६ लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

ऑक्टोबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ९ टक्क्यांनी झेप

पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त

पोलिस आणि अग्निशमन दलाने कालव्यात शोधमोहीम राबवल्यानंतर नितीन पाटील, कविता पाटील आणि त्यांची मुलगी स्वीटी यांचे मृतदेह आढळले. मात्र, प्रथमेश आणि हरीश या दोन मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून मोहीम सुरू आहे. या प्रकरणात करणने दिलेल्या जबाबामुळे हल्लेखोरांबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. चार संशयितांनी कुटुंबाला लक्ष्य केल्याचा पोलिसांना संशय आहे.

दरम्यान, या घटनेला विमा घोटाळ्याची पार्श्वभूमी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत पाटील कुटुंब विमा घोटाळ्यातील साक्षीदार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. त्यामुळे साक्षीदारांना संपवण्यासाठी हा कट रचण्यात आला होता का, या दिशेने तपास सुरू आहे. जळगाव आणि सुरत पोलिसांकडून समन्वयाने तपास केला जात असून, संशयितांचा शोध घेण्यासोबतच या हत्याकांडामागील नेमके कारण उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा