31 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरसंपादकीयहिंदूंना न्याय दिलात तर खबरदार...

हिंदूंना न्याय दिलात तर खबरदार…

Google News Follow

देशात संविधान बचाओच्या हाकाट्या पिटणारे, हिंदूंच्या संवैधानिक अधिकारांचा प्रश्न येतो तेव्हा लोकशाही गाडायलाही तयार होतात. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने अरुल्मिगु सुब्रमण्य स्वामी मंदीराच्या तिरुप्परनकुद्रंम टेकडीवर दिपपूजन करण्याचा निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले तरीही मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या सरकारने त्यात कोलदांडा घातला. हे घडू दिले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची बेअदबी केली, प्रकरण शेकले तेव्हा आज माफी मागून सरकार मोकळे झालेले आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, या देशात भाजपा वगळता एकाही पक्षाला हिंदू आस्थांशी देणेघेणे नाही. किंबहुना हिंदूंना शक्य तेवढे रगडून मुस्लिमांची मते मिळवण्याकडे त्यांचा कल असतो.

हिंदुस्तान हा हिंदू बहुल देश आहे. तरीही इथे हिंदूंना शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या प्रथा-परंपरा जपण्यासाठी त्यांना न्यायालयात लढावे लागते. न्यायालयाने बाजूने निकाल दिल्यानंतरही तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्षांची सरकारे आडवी येतात. हिंदूंच्या पदरात अन्यायच पडेल याची व्यवस्था करतात. हिंदूंची न्याय्य बाजू उचलून धरणाऱ्या न्यायाधीशांची बदनामी केली जाते. तामिळनाडूतील ‘किर्तिगाई दिपम्’ या उत्सावानिमित्त याची ताजी प्रचिती आलेली आहे. या ताज्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत राज्याचे ख्रिस्ती मुख्यमंत्री विजय जोसेफ.

२४ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या कार्तिगाई दीपम उत्सवादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही तिरुप्परनकुद्रंम दिवा लावण्याची परवानगी न दिल्यामुळे तामिळ हिंदूंमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मदुराईजवळील टेकडीच्या पायथ्याशी भगवान मुरुगन यांचे प्रसिद्ध अरुल्मिगु सुब्रमण्य स्वामी मंदिर आहे, तर टेकडीच्या माथ्यावर सुफी संत सिकंदर बादशहा यांचा दर्गा आहे. टेकडीच्या शिखरावर दर्ग्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर एक प्राचीन दगडी स्तंभ आहे, ज्याला तामिळ हिंदू भाविक ‘दीपथून’ अर्थात दीपस्तंभ मानतात. हिंदू संघटना आणि भक्तांच्या मते, हा स्तंभ मंदिराच्या मालकीचा असून कार्तिक पौर्णिमेला या सर्वोच्च शिखरावरील दीपथूनवर दिवा लावण्याची त्यांचा पारंपरिक अधिकार आहे. हिंदूंच्या भावना पायदळी तुडवणे हाच देशातील कट्टरवादी मुस्लीमांचा एक कलमी धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे दर्गा समितीने यात विरोध केला. हा स्तंभ मंदिराच्या मालकीचा नसून केवळ एक सर्वेक्षण स्तंभ आहे आणि शिवाय तो दर्ग्याच्या अत्यंत जवळ असल्यामुळे तिथे दिवा लावल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा सूर लावला. मुसलमानांच्या मशीदींसमोर वाद्य वाजवली, गुलाल उधळला तरी इस्लाम खतरे मे येतो, तामिळनाडूतील हा दर्गा सध्या या दिव्यामुळे धास्तावलेला आहे.

हे ही वाचा:

छठपूजेच्या सिंदूर परंपरेवर अश्लाघ्य बोलणाऱ्या महेश्वरीविरोधात एफआयआर

जन्मस्थळाबाबत स्पष्टीकरण द्या, मगच परदेशात जा!

स्थानिक दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर आता परदेशी दहशतवाद्यांचा शोध

अमेरिकेला ८,६०६ टन साखर निर्यातीसाठी भारताची मंजुरी

मुस्लिमांच्या आडमुठेपणामुळे गेली अनेक दशके हा दिवा शिखराऐवजी टेकडीवरील ‘उचीपिल्लैयार’ मंदिराजवळील ‘दीप मंडपम’ येथे लावला जात होता. हा वाद गेल्या शतकभरापासून सुरू होता. नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ मध्ये द्रमुक-काँग्रेस आघाडीच्या सरकारने मुस्लिमांची तळी उचलत, कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत दीपथूनवर दिवा लावण्यास बंदी घातली. तिथून हे प्रकरण न्यायालयात गेले. मुस्लिमांच्या दंडेलीमुळे खंडीत झालेली ही परंपरा सुरू कऱण्यासाठी हिंदूंनी न्यायालयीन लढ्याचा मार्ग स्वीकारला.

डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने दीपथूनचा भाग मंदिराचाच असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाची बंदी रद्द केली आणि तिथे दिवा लावण्याची परवानगी दिली. द्रमुकचे सत्ताधारी सरकार मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी एक महत्त्वाचा अंतरिम आदेश दिला. न्यायालयाने तूर्तास स्थंभाच्या मालकीबाबत कोणतीही टिप्पणी न करता, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी  दीपथूनवर दिवा लावण्याची सशर्त परवानगी दिली.

हा हिंदूंच्या श्रद्धा-परंपरांचा विजय होता. तामिळनाडूमध्ये आज द्रमुकची सत्ता नाही, परंतु तामिळनाडूचे विद्यमान ख्रिस्ती मुख्यमंत्री जोसेफ विजय तितकेच हिंदूविरोधी आहे. त्यांना हा निर्णय सहन कसा व्हावा. शिवाय त्यांना हिंदूविरोधी काँग्रेस पक्षाची साथ आहेच. राहुल गांधी मंदिरात जाण्याचा कितीही दिखावा करत असले, कितीही गंध टिळे लावून नौटंकी करत असले तरी ते काही हिंदू नाहीत. हिंदू आस्था पायदळी तुडवण्यात त्यांना धन्यता वाटते. त्याशिवाय मुस्लीम मत मिळणार नाहीत, याची त्यांना खात्री आहे. जातीय सलोखा बिघडेल असा दावा करत टीव्हीके सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना मंगळवारी २४ नोव्हेंबर रोजी तिरुप्परनकुद्रंम टेकडीवर दिवा लागला नाही. दीपथूनऐवजी जुन्या पारंपरिक ठिकाणीच म्हणजे उचीपिल्लैयार मंदिराजवळ सायंकाळी ६ वाजता महादीप प्रज्वलित केला. हा सरकारच्या दडपशाहीचा परिणाम होता. या दडपशाहीची प्रतिक्रीया उमटणार हे गृहीत धरून सरकारने मदुराईमध्ये ५,६०० हून अधिक पोलीस तैनात करून संचारबंदी लागू केली आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांच्यासह सुमारे ७५० भाजप व हिंदू मुन्नानी कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेत ठेवले. यामुळे टेकडीच्या पायथ्याशी हिंदू संघटना आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.

भाजपा आणि अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारवर ‘हिंदूविरोधी मानसिकता’ आणि ‘अल्पसंख्याक तुष्टीकरणाचा’ आरोप केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून सरकारने कोट्यवधी मुरुगन भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याची टीका भाजपने केली आहे.

राज्यातील शांतता आणि धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा आरोप टीव्हीकेचे नेते करीत आहेत. भाजप आणि आरएसएस या उत्सवाचा वापर करून तामिळनाडूमध्ये जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने त्यांची तळी उचललेली आहे.  सध्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याबद्दल अवमान याचिका आणि मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर पुढील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंदूंवर दडपशाही करून सरकारचे मन भरले नसल्यामुळे आता मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांना दाबात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये त्यांनी तिरुप्परनकुंद्रम टेकडीवरील ‘दीपथून’ स्तंभावर दिवा लावण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर, त्यांच्यावर दबावाचे प्रयोग सुरू झाले. स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग  चालवण्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेत प्रस्ताव मांडला. हा महाभियोग प्रस्ताव म्हणजे हिंदूंच्या बाजूने न्याय्य निर्णय दिल्यामुळे केले जाणारे सूडाचे राजकारण होते.

डिसेंबर २०२५ पर्यंत डीएमके आणि काँग्रेस पक्ष एकत्र होते. त्यांनी इंडी आघाडीच्या अन्य खासदारांसोबत न्यायमूर्ती स्वामीनाथन यांना पदावरून हटवण्यासाठी लोकसभेत महाभियोगाची नोटीस दिली होती. न्यायमूर्ती स्वामीनाथन हे संघ धार्जिणे असल्याचा दावा या नोटीसीत करण्यात आला. राज्य सरकारने कायदा-सुव्यवस्थेचा धोका असल्याचे सांगितल्यानंतरही न्यायमूर्तींनी दीपथूनवर दिवा लावण्याचे आदेश दिले, ज्यामुळे तामिळनाडूमध्ये जातीय तणाव निर्माण झाला, असा दावा खासदारांनी केला. न्यायमूर्तिच्या तटस्थपणावर प्रश्नचिन्ह लावण्याचा हा प्रयत्न होता.

या महाभियोग प्रस्तावानंतर देशभरातील न्यायिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. डिसेंबर २०२५ मध्ये सुमारे सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांच्या ५६ ते ९० निवृत्त न्यायमूर्ती या प्रस्तावाविरुद्ध जाहीर पत्र लिहून तीव्र निषेध नोंदवला. हा न्यायाधीशांवर दबाव आणण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला.

संविधानानुसार, एखाद्या न्यायाधीशाने दिलेला निकाल एखाद्या राजकीय पक्षाला आवडला नाही, म्हणून त्याच्यावर महाभियोग चालवता येत नाही. निकालावर आक्षेप असल्यास वरच्या न्यायालयात अपील करण्याचा मार्ग उपलब्ध असतो. “महाभियोगासारख्या घटनात्मक शस्त्राचा वापर एखाद्या न्यायाधीशावर दबावा आणण्यासाठी आणि सूड घेण्यासाठी केला जात आहे,” अशी कडवट टीका माजी न्यायाधीशांनी केली. न पटलेल्या प्रत्येक वादात्मक निर्णयानंतर खासदारांनी महाभियोगाची धमकी दिली, तर न्यायाधीश निर्भीडपणे काम करू शकणार नाहीत, असे मत या पत्रा मांडण्यात आले. केंद्र सरकार आणि भाजपनेही महाभियोगाच्या प्रस्तावावर टीका करताना म्हटले की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केवळ एका धार्मिक निकालावरून मतांच्या राजकारणासाठी न्यायमूर्तींवर महाभियोग आणण्याचा प्रयत्न झाला आहे.

हा महाभियोगाचा दबाव असूनही न्यायमूर्ती जी. आर. स्वामीनाथन यांनी या प्रकरणाच्या सुनावणीतून स्वतःला बाजूला केले नाही. २४ नोव्हेंबर २०२६ रोजीही त्यांच्याच खंडपीठाने मदुराई जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेली संचारबंदी आणि भाविकांना रोखण्याच्या निर्णयावर कडक ताशेरे ओढले. “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई होऊ शकते,” असा स्पष्ट इशारा देत त्यांनी आपली कठोर भूमिका कायम ठेवली आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा