31 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरराजकारणजन्मस्थळाबाबत स्पष्टीकरण द्या, मगच परदेशात जा!

जन्मस्थळाबाबत स्पष्टीकरण द्या, मगच परदेशात जा!

कॉक्रोच जनता पार्टीच्या सौरव दासला परराष्ट्र मंत्रालयाकडून निर्देश

Google News Follow

कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) चा सहसंयोजक सौरव दास याला त्याच्या जन्मस्थळाबाबत सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश चेन्नईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने दिले आहेत. तसेच स्पष्टीकरण सादर करेपर्यंत पासपोर्टचा वापर करू नये, असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बुधवारी ही माहिती दिली.

रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, कायदा अंमलबजावणी यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या अहवालांच्या आधारे २३ नोव्हेंबर रोजी पासपोर्ट कार्यालयाने सौरव दास याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपली अचूक माहिती देणे आवश्यक आहे. एखाद्या अर्जदाराने महत्त्वाची माहिती लपवल्याचे किंवा अधिकृत कागदपत्रांमध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यासाठी कारणे दाखवा नोटीस जारी केली जाते, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

उमर खालिद, शर्जिल इमामला जामीन नाही!

स्थानिक दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर आता परदेशी दहशतवाद्यांचा शोध

कुर्ला प्रकरणातील हल्लेखोर अल्पवयीन मुलांचा मदरशाशी संबंध नाही!

युवीचा गुरुमंत्र, वैभवचा षटकारतंत्र!

परराष्ट्र मंत्रालयाचे हे स्पष्टीकरण सौरव दास याने सोमवारी केलेल्या आरोपानंतर आले आहे. २४ नोव्हेंबर रोजी त्याने दावा केला होता की, लंडनला जाणाऱ्या विमानात बसण्यापूर्वी दिल्ली विमानतळावर त्यांना रोखण्यात आले. पीटीआयशी बोलताना दास याने सांगितले की, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट तपासणीसाठी चिन्हांकित करण्यात आल्याची माहिती दिली. तो पहाटे १ वाजताच्या विमानाने लंडनला जाणार होता.

ऑक्सफर्ड विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ‘कॉकरोच मूव्हमेंट’ या आंदोलनाबाबत बोलण्यासाठी त्यांना ब्रिटनमध्ये आमंत्रित करण्यात आले होते.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये सौरव दास याने त्याच्या परदेश प्रवासात अडथळा आणल्याबद्दल मोदी सरकारला जबाबदार धरले. ऑक्सफर्ड विद्यापीठाव्यतिरिक्त केंब्रिज विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि एडिनबरा विद्यापीठ येथेही भाषणासाठी आमंत्रण मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

अभिजित दिपके यांच्याकडून सरकारवर टीका

कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके यानेही या घटनेवरून केंद्र सरकारवर टीका केली. सौरव दास याला ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून मिळालेल्या आमंत्रणामुळे सत्तेत असलेल्या कोणाला तरी असूया वाटत असल्याचा आरोप त्याने केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा