28 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरराजकारणपाकिस्तानचे हित जपणारा पक्ष म्हणजे काँग्रेस!

पाकिस्तानचे हित जपणारा पक्ष म्हणजे काँग्रेस!

२६/११ हल्ल्याचा उल्लेख करत निशिकांत दुबेंचा निशाणा

Google News Follow

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. २६/११ च्या हल्ल्यावेळी काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या पाकिस्तानविषयक धोरणावरही निशाणा साधला. ‘काँग्रेसचा काळा अध्याय’ या मालिकेतील २५५ व्या भागात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसला पाकिस्तानधार्जिणा पक्ष म्हटले आहे. पाकिस्तानचे हित जपणारा पक्ष म्हणजे काँग्रेस, अशी टीका करत निशिकांत दुबे यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला.

निशिकांत दुबे यांनी आपल्या पोस्टमध्ये २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे ६० तास सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांशी लढा दिला. या काळात भारतीय जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दहशतवाद्यांचा सामना केला. मात्र, दुसरीकडे काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दुबे यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ल्यादरम्यान पहाटे पाच वाजेपर्यंत पार्टी केल्याचा आरोप केला. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील सतत कपडे बदलत होते, तर मुख्यमंत्री विलासराव देशमुख चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकेशन पाहत होते, असा दावाही त्यांनी केला.

मुंबई हल्ल्यानंतरही काँग्रेस सरकारने पाकिस्तानसोबत चर्चा सुरू ठेवल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला. हल्ल्यापूर्वी सप्टेंबर २००८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची भेट झाली होती. त्यानंतर जानेवारी २००९ मध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट झाली. जून २००९ मध्येही आंतरराष्ट्रीय दबावाखाली चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा:

संविधान कमकुवत करणाऱ्यांच्याच हाती पाच दशके सत्ता

काश्मीरमधून गायब झालेले ३० जण पाकिस्तानात सक्रिय

अनंत अंबानींसोबतच्या व्हायरल व्हिडीओवरून शाहरुखची कायदेशीर नोटीस

हिंदूंना न्याय दिलात तर खबरदार…

तत्कालीन काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या कमकुवत भूमिकेमुळे दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन मिळाल्याचा आरोपही निशिकांत दुबे यांनी केला. २००९ मधील गोवा आणि आसाममधील बॉम्बस्फोटांचा तसेच २०१० मधील विविध स्फोटांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसच्या सुरक्षा धोरणावर प्रश्न उपस्थित केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा