30.9 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरबिजनेसआरबीआयने ७४० टन सोने आणले मायदेशी

आरबीआयने ७४० टन सोने आणले मायदेशी

भारताची मोठी रणनीती

Google News Follow

जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता, अमेरिका आणि युरोपमधील बदलते आर्थिक धोरण तसेच आंतरराष्ट्रीय संघर्षांच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या सोन्याच्या साठ्याबाबत मोठा रणनीतिक निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) परदेशात ठेवलेला सोन्याचा साठा टप्प्याटप्प्याने भारतात आणण्यास प्राधान्य दिले आहे. सप्टेंबर २०२६ अखेर भारताकडे एकूण ८८०.५२ टन सोने होते. त्यापैकी तब्बल ७४०.१३ टन सोने देशांतर्गत तिजोऱ्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. म्हणजेच भारताच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी जवळपास ८४ टक्के सोने आता मायदेशात आहे. चार वर्षांपूर्वी हे प्रमाण केवळ ३९ टक्के होते. त्यामुळे भारताच्या आर्थिक धोरणातील हा महत्त्वाचा बदल मानला जात आहे.

भारताने हा निर्णय घेण्यामागे जागतिक राजकारणातील घडामोडी महत्त्वाच्या आहेत. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाच्या परकीय चलनसाठ्यावर निर्बंध लादले होते. या घटनेने जगातील अनेक देशांना परदेशात ठेवलेल्या आर्थिक मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत विचार करण्यास भाग पाडले. एखाद्या देशाचे सोने परदेशातील बँकांमध्ये असले, तरी आंतरराष्ट्रीय संघर्ष किंवा निर्बंधांच्या परिस्थितीत त्याचा वापर करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे स्वतःच्या मालकीचे सोने स्वतःच्या देशात ठेवणे भारतासाठी अधिक सुरक्षित पर्याय ठरत आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे आणि आर्थिक संकटाच्या काळात स्वतःची ताकद कायम ठेवणे, हा या रणनीतीमागील प्रमुख उद्देश आहे.
हे ही वाचा:
किरकोळ महागाईचा दर ६.०९ टक्क्यांवर

‘अतिरिक्त उत्पादन क्षमता’चा अमेरिकेचा दावा भारताने फेटाळला

महापौर रितू तावडेंसह आयुक्त अश्विनी भिडेंना धमकीचा मेल

पासपोर्टमधील त्रुटींप्रकरणी सौरव दास विरोधात लूकआऊट सर्क्युलर

विशेष म्हणजे, आरबीआयने एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवीन सोने खरेदी केलेले नाही, तर आधीपासून असलेल्या सोन्याच्या साठ्याचे स्थान बदलले आहे. मार्च २०२३ मध्ये भारतात ३०१.१० टन सोने होते. मार्च २०२४ मध्ये हा साठा ४०८.३१ टन, मार्च २०२५ मध्ये ५११.९९ टन आणि मार्च २०२६ मध्ये ६८०.०५ टनांवर पोहोचला. त्यानंतर सप्टेंबर २०२६ पर्यंत आणखी सोने भारतात आणण्यात आले. यापूर्वी लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडमध्ये भारताचे मोठ्या प्रमाणावर सोने ठेवले जात होते. मात्र, देशांतर्गत साठवणुकीमुळे सोन्यावर थेट नियंत्रण ठेवणे आणि गरजेच्या वेळी त्याचा वापर करणे अधिक सोपे होते.

भारताच्या या निर्णयाला १९९१ च्या आर्थिक संकटाची ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे. त्या काळात परकीय चलनसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे भारताला कर्ज मिळवण्यासाठी ४६.९१ टन सोने परदेशात तारण ठेवावे लागले होते. मात्र, आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली असून देश स्वतःचे सोने परदेशातून मायदेशी आणत आहे. मुंबई आणि नागपूरमधील सुरक्षित तिजोऱ्यांमध्येही सोन्याची साठवणूक केली जात आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ सोन्याच्या साठवणुकीपुरता मर्यादित नसून भारताचे आर्थिक सार्वभौमत्व, सुरक्षितता आणि जागतिक आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढवणारी दीर्घकालीन रणनीती आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा