30.9 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरक्राईमनामामहापौर रितू तावडेंसह आयुक्त अश्विनी भिडेंना धमकीचा मेल

महापौर रितू तावडेंसह आयुक्त अश्विनी भिडेंना धमकीचा मेल

मुंबईत ग्रेनेड हल्ल्यांचा इशारा

Google News Follow

मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून ११ मिनिटांनी महापौर कार्यालयात बॉम्बस्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील ३० दिवसांत मुंबईत विविध ठिकाणी ग्रेनेड हल्ले आणि २७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान मेट्रो स्थानकांवर आयईडी स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे.

संबंधित ई-मेलमध्ये महालक्ष्मी, जलसा बंगला, आचार्य मेट्रो स्थानक या ठिकाणांवर आयईडी पेरण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ई-मेलमध्ये खलिस्तानसमर्थक घोषणा देण्यात आल्या असून १९८४ मधील शीखविरोधी हिंसाचाराचा संदर्भही देण्यात आला आहे. तसेच खलिस्तान नॅशनल आर्मी आणि बब्बर खालसा या संघटनांची नावे नमूद करण्यात आली आहेत. या धमकीमुळे मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली आहे. ई-मेलचा स्रोत, त्यामागील व्यक्ती किंवा संघटना आणि धमकीची सत्यता याबाबत तपास केला जात आहे.

हे ही वाचा:

पासपोर्टमधील त्रुटींप्रकरणी सौरव दास विरोधात लूकआऊट सर्क्युलर

गुजरातमध्ये महामार्गावर उतरली लष्कराची विमाने

पाकिस्तानचे हित जपणारा पक्ष म्हणजे काँग्रेस!

संविधान कमकुवत करणाऱ्यांच्याच हाती पाच दशके सत्ता

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा