30.9 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरराजकारणतिजोरीत खडखडाट, तरी चर्चना ख्रिसमससाठी ३० हजार!

तिजोरीत खडखडाट, तरी चर्चना ख्रिसमससाठी ३० हजार!

मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात

Google News Follow

राज्याची तिजोरी रिकामी असल्याचे आणि विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे सांगणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे सरकार आता ख्रिसमसच्या तयारीसाठी प्रत्येक पात्र चर्चला ३० हजार रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत मुख्यमंत्री वारंवार निधीची कमतरता असल्याचे सांगत असताना चर्चच्या सजावट आणि रोषणाईसाठी अनुदान मंजूर करण्यात आल्याने या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्यातील पात्र आणि नोंदणीकृत चर्चना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर चर्चचे रंगकाम आणि विद्युत रोषणाई करण्यासाठी हा निधी दिला जाणार आहे. तेलंगणा ख्रिश्चन मायनॉरिटीज फायनान्स कॉर्पोरेशनने यासंदर्भात माहिती दिली आहे. सरकार दरवर्षी ख्रिसमस हा राज्यस्तरीय सण म्हणून साजरा करते. या मदतीसाठी राज्यातील जिल्ह्यांमधील तसेच ग्रेटर हैदराबाद, सायबराबाद आणि मलकाजगिरी महापालिका क्षेत्रातील पात्र चर्चना अर्ज करता येणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यापूर्वी राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. मार्च २०२५ मध्ये त्यांनी राज्याच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा वेतन, निवृत्तिवेतन आणि कर्जाच्या परतफेडीसाठी खर्च होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भांडवली खर्चासाठी मर्यादित निधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

हे ही वाचा:

पाकिस्तानी कंटेंट भारतात दाखवू नका!

महापौर रितू तावडेंसह आयुक्त अश्विनी भिडेंना धमकीचा मेल

पासपोर्टमधील त्रुटींप्रकरणी सौरव दास विरोधात लूकआऊट सर्क्युलर

गुजरातमध्ये महामार्गावर उतरली लष्कराची विमाने

आंध्र प्रदेशातील भाजपच्या प्रवक्त्या डॉ. विनूषा रेड्डी यांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले की, एकीकडे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी राज्याचा खजिना रिकामा असल्याचे आणि विकासासाठी निधीची कमतरता असल्याचे म्हटले असताना, दुसरीकडे त्यांचे सरकार ख्रिसमस उत्सवासाठी प्रत्येक पात्र नोंदणीकृत चर्चला ३०,००० रुपये मंजूर करत आहे. जर आर्थिक परिस्थिती इतकी बिकट असेल, तर सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा