30 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरस्पोर्ट्स२०३६ च्या ऑलिम्पिकसाठी भारताची आयओसी समोर तयारी

२०३६ च्या ऑलिम्पिकसाठी भारताची आयओसी समोर तयारी

अहमदाबादवर विशेष भर

Google News Follow

२०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांच्या यजमानपदासाठी भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) फ्युचर होस्ट कमिशनसमोर आपली भूमिका मांडली आहे. गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या ऑनलाइन सादरीकरणात भारताने अहमदाबादमधील पायाभूत सुविधा, क्रीडा संकुले, वाहतूक व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाची क्षमता यावर भर दिला. ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी अहमदाबादला केंद्रस्थानी ठेवून भारताने आपला विकास आराखडा सादर केला.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सादरीकरणात केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया, पी. टी. उषा, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, नीता अंबानी, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. अहमदाबादमध्ये २०३० च्या राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन होणार आहे. त्यामुळे या स्पर्धांसाठी विकसित होणाऱ्या क्रीडा सुविधा २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठीही उपयुक्त ठरू शकतात. भारताने जागतिक स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्याची क्षमता आणि भविष्यातील नियोजन समितीसमोर मांडले.

भारतासह जर्मनी, हंगेरी, कतार, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्किये हे सात देश ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत आहेत. यजमानपदासाठी आर्थिक नियोजन, पर्यावरणपूरक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि स्पर्धांनंतर निर्माण होणारा दीर्घकालीन वारसा या निकषांवरही विचार केला जाणार आहे. २०२७ मध्ये पुढील मूल्यांकन प्रक्रिया होणार असून, २०२९ मध्ये यजमानपदाबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे भारताच्या या सादरीकरणाकडे क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा