32 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरबिजनेसएआयमुळे एमएसएमई क्षेत्रात ७०० अब्ज डॉलरच्या आर्थिक मूल्यनिर्मितीची संधी

एआयमुळे एमएसएमई क्षेत्रात ७०० अब्ज डॉलरच्या आर्थिक मूल्यनिर्मितीची संधी

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रांचा विश्वास

Google News Follow

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञान भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) आर्थिक विकासाचे नवे दालन खुले करू शकते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एमएसएमई क्षेत्रात ६०० ते ७०० अब्ज डॉलर इतके आर्थिक मूल्य निर्माण होण्याची क्षमता असल्याचा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असलेल्या या क्षेत्राला एआयमुळे उत्पादकता वाढवण्यासह जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक बनण्याची मोठी संधी मिळणार आहे.

मात्र, या संधीचा लाभ घेण्यासाठी भारतीय उद्योगांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार वेगाने करणे आवश्यक आहे. सध्या देशातील एमएसएमई उद्योगांपैकी केवळ १५ टक्के उद्योग एआयचा वापर करत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विस्ताराला मोठा वाव आहे. एआयच्या मदतीने उत्पादन प्रक्रियेतील अचूकता वाढवणे, खर्च कमी करणे, ग्राहकांच्या मागणीचा अंदाज घेणे, पुरवठा साखळीचे व्यवस्थापन आणि व्यवसायातील निर्णय अधिक प्रभावीपणे घेणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, मर्यादित मनुष्यबळ आणि भांडवल असलेल्या लहान उद्योगांनाही यामुळे मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करता येईल.
हे ही वाचा:
‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

अमेरिकेच्या टॅरिफचे आव्हान झुगारत भारताची १ ट्रिलियन डॉलर निर्यातीची झेप!

अमेरिकेच्या शुल्क कपातीने निर्यातदारांची चिंता कायम

महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?

भारतीय अर्थव्यवस्थेत एमएसएमई क्षेत्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. देशाच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा सुमारे ३१ टक्के असून, उत्पादन क्षेत्रात २५ टक्के आणि निर्यातीत जवळपास निम्मे योगदान आहे. तसेच, ४५ कोटींहून अधिक लोकांना या क्षेत्रातून रोजगार मिळतो. त्यामुळे या उद्योगांची कार्यक्षमता वाढल्यास त्याचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर आणि रोजगारनिर्मितीवर होऊ शकतो.

दरम्यान, या उद्योगांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी रिझर्व्ह बँकेने तारणमुक्त कर्जाची मर्यादा १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये केली आहे. चांगला परतफेडीचा इतिहास असलेल्या उद्योगांना २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होण्याची तरतूद आहे. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रातील बँक कर्जवाटपात वार्षिक सरासरी १९ टक्के वाढ झाली आहे. मात्र, आर्थिक मदतीसोबतच तंत्रज्ञानाचा स्वीकारही तितकाच महत्त्वाचा आहे. एआय आणि सुलभ वित्तपुरवठ्याची सांगड घातल्यास भारतीय एमएसएमई क्षेत्र जागतिक स्तरावर नवी झेप घेऊ शकते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा