32 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरविशेष‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Google News Follow

रामायण महाकाव्यावर आधारित चित्रपटात अनेक तथ्यांचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप करत दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी नकार दिला. ‘चित्रपट निर्मात्यांनी त्यांना समजलेल्या पद्धतीने रामायण मांडले आहे. तुमचा त्यावर वेगळा दृष्टिकोन असेल, तर तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून चित्रपट तयार करा,’ अशा शब्दांत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलांना सुनावले. चित्रपट आधीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असल्याने प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी हे प्रकरण आले. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी चित्रपटात रामायणातील अनेक घटनांचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा दावा केला. नव्या पिढीपर्यंत चुकीची माहिती पोहोचण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

यावर सरन्यायाधीशांनी चित्रपट आधीच प्रदर्शित झाला असून, ज्यांना तो पाहायचा होता त्यांनी तो पाहिला आहे, असे सांगितले. तसेच चित्रपटाचे कौतुक करणारे आणि त्यावर टीका करणारे असे दोन्ही प्रकारचे प्रेक्षक असू शकतात. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले. वेगळे मत असल्यास त्यावर चित्रपट किंवा माहितीपट तयार करता येईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

हे ही वाचा : 

महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?

मुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर

३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन

बनावट भारतीय सोशल मीडिया खात्यांमधून पाकच्या भारताविरोधात कुरापती

याचिकाकर्त्याने २३ नोव्हेंबर रोजी याचिका दाखल केली होती. मात्र, अद्याप सुनावणीसाठी तारीख मिळाली नसल्याने तातडीने प्रकरण सूचीबद्ध करण्याची मागणी करण्यात आली होती. नितेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. यात रणबीर कपूरने राम, साई पल्लवीने सीता, तर यशने रावणाची भूमिका साकारली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा