27 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरराजकारणमुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर

मुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर

निकालाविरोधातील याचिका फेटाळण्यास नकार

Google News Follow

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांच्या पेरंबूर विधानसभा मतदारसंघातील विजयासंदर्भातील निवडणूक याचिकेवर आता नियमित सुनावणी होणार आहे. ही याचिका सुरुवातीलाच फेटाळण्याची विजय यांची मागणी मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) फेटाळली. त्यामुळे निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तांच्या व्यवहारांची माहिती लपवल्याच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती व्ही. लक्ष्मीनारायणन यांनी हा आदेश दिला.

पेरंबूरमधील मतदार एस. दिनेश यांनी विजय यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देत याचिका दाखल केली होती. विजय यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही मालमत्ता व्यवहारांची माहिती दिली नसल्याचा किंवा चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेषतः जानेवारी २०२६ मध्ये पनरुटी येथे तीन एकर जमीन ३० कोटी रुपयांना खरेदी केल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद नसल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये पाडी येथील व्यावसायिक मालमत्ता ३५ कोटी रुपयांना विकल्याचा व्यवहारही लपवल्याचा आरोप आहे. याशिवाय, कोडाईकनालमधील ५० सेंट जमीन कृषी जमीन म्हणून दाखवण्यात आली असली, तरी महसूल नोंदींनुसार ती सरकारी जमीन असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

विजय यांचा आरोपांना विरोध

विजय यांनी हे आरोप फेटाळत याचिका सुरुवातीलाच रद्द करण्याची मागणी केली होती. प्रतिज्ञापत्रातील कथित त्रुटींमुळे निवडणूक निकालावर कसा परिणाम झाला, हे याचिकेत स्पष्ट केलेले नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. तसेच विजय यांनी ६०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जाहीर केली असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले.

हे ही वाचा : 

३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन

बनावट भारतीय सोशल मीडिया खात्यांमधून पाकच्या भारताविरोधात कुरापती

भारताकडून पाकिस्तान सीमेवर एस-४००ची पाचवी ढाल

हसीनांच्या माजी उप प्रसिद्धी सचिवासह तिघांना अटक

एप्रिल २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत विजयने पेरांबूरमध्ये १,२०,३६५ मते मिळवून द्रमुकचे आर. डी. शेखर यांचा ५३,७१५ मतांनी पराभव केला. पेरांबूर मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी रिक्त केलेल्या तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघातूनही ते विजयी झाले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा