30 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरक्राईमनामामाहीम गोळीबारातील हल्लेखोर गुजरातच्या दिशेने व्हाया मालाड

माहीम गोळीबारातील हल्लेखोर गुजरातच्या दिशेने व्हाया मालाड

तपास क्राईम ब्रँचकडे

Google News Follow

माहीम येथील पीसी जैन ज्वेलर्स दुकानावर गोळीबार करून पसार झालेल्या दोन्ही हल्लेखोरांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दुचाकी आणि जॅकेट वांद्रे येथील लालमिठ्ठी परिसरात सोडले. त्यानंतर वांद्रे रेल्वे स्थानकातून बोरिवलीच्या दिशेने जाणारी लोकल पकडून मालाड येथे उतरले आणि तेथून महामार्गाने गुजरातच्या दिशेने पलायन केल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या तपासातून समोर आली आहे. आरोपींच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, या गोळीबार प्रकरणाचा तपास माहीम पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

माहीम येथील एल. जे. रोडवरील हॉटेल शोभाजवळ असलेल्या पीसी जैन ज्वेलर्स दुकानाबाहेर बुधवारी सायंकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन हेल्मेटधारी हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली, तरी भरवस्तीत झालेल्या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. ज्वेलर्सचे मालक भरत जैन यांना यापूर्वी खंडणीसाठी धमकीचे संदेश आले होते. त्यामुळे खंडणीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक संशय आहे.

हे ही वाचा:

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा

जयंत पाटलांचा पांढऱ्या हत्तीवरून प्रवास

आज एका दीपमला रोखले, उद्या मंदिरांमध्ये जाण्यासही बंदी घालाल?’

रितब्रत बॅनर्जींची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती रद्द

दुचाकी भिवंडीतून चोरीची

हल्लेखोरांनी गोळीबारासाठी वापरलेली मोटारसायकल पोलिसांना वांद्रे येथील लालमिठ्ठी परिसरात सापडली. आरोपींनी तेथे दुचाकीसह अंगावरील जॅकेटही सोडून दिले आणि रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर लोकलने मालाड गाठून तेथून महामार्गाच्या मार्गाने पसार झाल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल काही दिवसांपूर्वी भिवंडी परिसरातून चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दुचाकी चोरीच्या ठिकाणापासून ते गोळीबाराच्या घटनास्थळापर्यंत आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

बिष्णोई टोळीचा संबंध नसल्याचा दावा

या गोळीबाराची पद्धत बिष्णोई टोळीच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीशी मिळतीजुळती असल्याची चर्चा असली, तरी या प्रकरणात बिष्णोई टोळीचा कोणताही संबंध नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. प्राथमिक तपासात स्थानिक टोळीचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, गोळीबारामागील नेमके कारण आणि आरोपींची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, पोलिसांनी ज्वेलर्स मालक भरत जैन यांच्याकडेही चौकशी केली. १९९३ मध्ये त्यांच्या मोठ्या भावाची दुकानात हत्या झाली होती. दरोड्याच्या उद्देशाने दुकानातील नोकरांनी ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. मात्र, त्या जुन्या हत्येचा आणि बुधवारी झालेल्या गोळीबाराचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आता हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, चार पथकांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. खंडणीसाठी आलेले संदेश, चोरीची मोटारसायकल, आरोपींचा पलायनाचा मार्ग आणि संभाव्य स्थानिक टोळीचा सहभाग या सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा