30.9 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरराजकारणआज एका दीपमला रोखले, उद्या मंदिरांमध्ये जाण्यासही बंदी घालाल?’

आज एका दीपमला रोखले, उद्या मंदिरांमध्ये जाण्यासही बंदी घालाल?’

अश्विनी वैष्णव यांचा तामिळनाडूतील विजय सरकारवर हल्लाबोल

Google News Follow

तामिळनाडूतील थिरुपरंकुंद्रम कार्तिगाई दीपम वादावरून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी तामिळनाडू सरकारवर जोरदार टीका केली. सरकारच्या भूमिकेमुळे लाखो लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मंदिरांच्या परंपरा आणि धार्मिक प्रथांवर निर्बंध घालण्याच्या प्रयत्नांबाबत त्यांनी राज्य सरकारला इशाराही दिला.

चेन्नई येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलताना वैष्णव यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.

थिरुपरंकुंद्रम येथील दीपथून दगडी स्तंभावर पारंपरिक दीप प्रज्वलित करण्यासंदर्भातील वादाचा उल्लेख करत वैष्णव यांनी मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वैष्णव म्हणाले, “तामिळनाडू एकसंध आहे. एका दीपमला रोखून तुम्ही लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांना धक्का पोहोचवला आहे आणि त्यांच्या भावनांशी खेळ केला आहे. याचे पुढे काय होणार? आज तुम्ही एका दीपमला रोखले आहे, उद्या तुम्ही म्हणाल की कोणालाही मंदिरात जाता येणार नाही? मंदिरांनाच टाळे लावणार का? त्यांना नेमके हेच हवे आहे का?”

ते पुढे म्हणाले, “संविधानाचा खरा सन्मान करायचा असेल, तर धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. आपली संस्कृती, भगवान मुरुगन आणि आपल्या प्राचीन वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे.”

दरम्यान, वार्षिक कार्तिगाई दीपम सोहळ्यावरून तामिळनाडूमध्ये तणाव कायम आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत थिरुपरंकुंद्रम टेकडीवरील उची पिल्लयार मंदिराच्या वरच्या भागात महादीप प्रज्वलित करण्यात आला. मात्र, वादग्रस्त दीपथून स्तंभावर दीप प्रज्वलित करण्यात आला नाही. सुब्रमण्यस्वामी मंदिराशी संबंधित पुजाऱ्यांच्या पथकाने नेहमीच्या ठिकाणी धार्मिक विधी पार पाडला.

हे ही वाचा:

अमेरिकेच्या टॅरिफचे आव्हान झुगारत भारताची १ ट्रिलियन डॉलर निर्यातीची झेप!

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

हिंदूंना न्याय दिलात तर खबरदार…

भारताकडून पाकिस्तान सीमेवर एस-४००ची पाचवी ढाल

या वादानंतर हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने निर्बंध लागू केले. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांसह हिंदू संघटनांच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. हा संपूर्ण वाद आता सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला आहे. गुरुवारी न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने दीपथून स्तंभावर दीप प्रज्वलित न केल्याप्रकरणी दाखल अवमान याचिका आणि इतर अर्ज २७ नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध केले जातील, असे सांगितले. “सर्व प्रकरणे उद्या सूचीबद्ध केली जातील,” असे खंडपीठाने स्पष्ट केले.

बुधवारी तामिळनाडू सरकारने या घटनेबद्दल न्यायालयाची माफी मागितली होती. या प्रकरणासाठी मंदिर प्रशासनाला जबाबदार धरले होते. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून अवमान कारवाई सुरू करण्यास नकार दिला होता.

अश्विनी वैष्णव यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवरून आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरूनही काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस पक्ष निवडणूक प्रक्रियेवर सोयीनुसार प्रश्न उपस्थित करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, “काँग्रेसला स्वतःच्या अपयशाचे खापर एसआयआरवर फोडायचे आहे. त्यामुळे त्यांना अशाच प्रकारे अपयश येत राहील. कारण त्यांच्यासाठी संविधान महत्त्वाचे नाही, तर त्यांचे कुटुंब महत्त्वाचे आहे.”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा