27.5 C
Mumbai
Saturday, November 28, 2026
घरदेश दुनियाइटलीच्या शाळांमध्ये बुरखा, निकाबवर बंदी!

इटलीच्या शाळांमध्ये बुरखा, निकाबवर बंदी!

मेलोनी सरकारकडून कायदा मंजूर

Google News Follow

इटलीने शाळांमधील धार्मिक पोशाख आणि परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने शाळांमध्ये बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी घालण्यासह वर्गातील परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचा कायदा मंजूर केला आहे. इटलीच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने या विधेयकाला मंजुरी दिली. यापूर्वी वरिष्ठ सभागृहानेही त्याला मान्यता दिली होती.

नव्या कायद्यानुसार, शाळांमधील विद्यार्थ्यांना चेहरा पूर्णपणे झाकणारा बुरखा किंवा निकाब परिधान करता येणार नाही. चेहरा ओळखता येणार नाही, अशा प्रकारचे आवरण घालून शालेय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासही मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजार युरोंपर्यंत दंड होऊ शकतो.

या कायद्यानुसार, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील पहिल्या वर्षाच्या वर्गांमध्ये विशिष्ट निकषांनुसार परदेशी विद्यार्थ्यांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार आहे. मात्र, ही मर्यादा सर्व परदेशी विद्यार्थ्यांना लागू नसून इटालियन भाषा पुरेशी अवगत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. प्राथमिक शाळांमध्ये इटलीत जन्म न झालेले आणि किमान दोन वर्षे पूर्वप्राथमिक शिक्षण न घेतलेले परदेशी विद्यार्थी या निकषांत येतील. माध्यमिक शाळांमध्ये इटलीच्या शिक्षण व्यवस्थेत किमान तीन वर्षे शिक्षण न घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल. भाषेवर प्रभुत्व असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना या मर्यादेतून सूट असेल.

पालकांनाही इटालियन भाषा शिकावी लागणार

विद्यार्थ्यांच्या भाषिक अडचणी दूर करण्यासाठी परदेशी पालकांनाही इटालियन भाषा शिकण्याचे प्रशिक्षण घेण्याची तरतूद करण्यात आली आहे. सरकारच्या मते, एकाच वर्गात इटालियन भाषा न जाणणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि इतर विद्यार्थ्यांशी संवादावर परिणाम होतो. त्यामुळे भाषिक एकात्मतेला प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.

हे ही वाचा : 

बिसलेरीच्या पाण्यात पुन्हा जीवाणू

जैशशी संबंधित संशयित दहशतवादी गुजरातमध्ये अटकेत

‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?

दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित करण्याऐवजी शाळांमध्ये शिक्षक आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा वाढवण्यावर भर द्यायला हवा, असे विरोधकांचे म्हणणे आहे. काही संघटनांनी या निर्णयामुळे स्थलांतरित मुलांमध्ये भेदभाव वाढण्याची भीतीही व्यक्त केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा