30 C
Mumbai
Wednesday, December 24, 2025
घरविशेषटोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताचे गोल्डमिंटन

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताचे गोल्डमिंटन

Google News Follow

Related

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. नुकतंच भारताच्या प्रमोद भगतने एसएल ३ स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. आधी सेमीफायनलच्या सामन्यात जपानच्या दायसुके फुजिहाराला नमवत प्रमोदने अंतिम सामन्यात धडक घेतली होती. अंतिम सामन्यात पोहचताच त्याने किमान रौप्य पदक निश्चित केलं होतं. अंतिम सामन्यातही धडाकेबाज कामगिरी करत प्रमोदने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथलला पराभूत केलं. या विजयासोबतच प्रमोदने भारताला स्पर्धेतील चौथं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

दोन्ही सेटमध्ये सरळ विजय मिळवत प्रमोदने सामना जिंकला. पहिला सेट २१-१४ च्या फरकाने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये डॅनियलने पुनरागमन करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. पण शेवटच्या काही वेळात प्रमोदने उत्कृष्ट खेळ दाखवल सेट २१-१७ च्या फरकाने जिंकत सुवर्णपदक खिशात घातलं.

हे ही वाचा:

जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा

कोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं?

भारताने गाठला परकीय चलन साठ्याचा उच्चांक

बोरिवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग, जीवितहानी टळली 

भारताने बॅडमिंटनमध्ये आणखी दोन पदकं निश्चित केली आहेत. यामध्ये एक पदक हे भारताचे सुहास यथिराज यांनी सेमीफायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवल्यानंतर केलं आहे. त्यांनी पुरुषांच्या एसएल ४ कॅटेगरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात इंडोनेशियाच्या खेळाडूला सरळ दोन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. यावेळी पहिला सेट २१-९ तर दुसरा सेट २१-१५ ने सुहास यांनी जिंकला. सुहास यथिराज हे आता फायनलमध्ये पोहोचल्याने रौप्य पदकतर निश्चित झालं आहे. पण सुवर्णपदकाची आशाही कायम आहे. सुहास यांच्याच प्रमाणे पॅराबॅडमिंटनपटू कृष्णा नागरने पुरुष एकेरीच्या एसएच६ गटामध्ये सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनच्या क्रिस्टन कूंब्सला मात देत भारताच्या खात्यात आणखी एक पदक निश्चित केलं आहे. २२ वर्षीय कृष्णाने या सामन्यात जगातील पाचव्या क्रमांकाच्या क्रिस्टनला मात दिली. त्याने दोन सरळ सेट्मध्ये विजय मिळवत सामना खिशात घातला. पहिला सेट त्याने २१-१० ने तर दुसरा २१-११ ने जिंकत फायनलमध्ये जागा मिळवली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा