29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
घरक्राईमनामानिर्भयांची कामगिरी; चोरावर पडली भारी..

निर्भयांची कामगिरी; चोरावर पडली भारी..

Google News Follow

Related

निर्भया पथकातील महिला पोलिसावर धावत्या लोकलमध्ये हल्ला करून पळून निघत असणारा भामटा आता पकडला गेला आहे. सोनसाखळी खेचून हा चोरटा पळण्याच्या प्रयत्नात होता. या चोरट्याला निर्भया पथकातील महिला पोलिसांनी पकडले आहे. ही घटना मंगळवारी जुईनगर ते मानखुर्द रेल्वे स्थानकादरम्यान घडली. कृष्णा वासू राठोड (१९) असे या चोराचे नाव आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी त्याला जबरी चोरीच्या गुह्याखाली अटक केली आहे.

नेरूळ येथे राहणाऱ्या महिला पोलिस अंजली कोरडे रेल्वे पोलिसांच्या निर्भया पथकामध्ये काम करतात. मंगळवारी त्या कामाला जाण्यासाठी साध्या वेशात निघाल्या होत्या. त्यांनी जुईनगर रेल्वे स्थानकातून कामावर जाण्यासाठी ट्रेन पकडली. सीएसटी लोकलच्या महिलांसाठी असलेल्या प्रथम वर्गाच्या डब्यातून त्या प्रवास करत होत्या. त्याचवेळी या डब्यामध्ये एक पुरुष बसल्याने कोरडे यांनी त्‍याला पुढील स्‍थानकावर खाली उतरून पुरुषांच्या डब्यात जाण्यास सांगितले. मात्र त्‍याने कोरडेंना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या चोरट्याने त्यांची सोनसाखळी हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात असताना कोरडेंनी त्‍याला प्रतिकार करीत आरडाओरड केली.

 

हे ही वाचा:

सोमवारपासून विद्या येई घमघम…

आर्यन खानसह तिघांना एनसीबीने केली अटक!

आर्यनबाबत शाहरुखने केलेले ते वक्तव्य खरे ठरतेय?

‘कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्स प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही’

 

वाशी रेल्वे स्‍थानकात लोकल निर्भया पथकातील महिला पोलिस हवालदार इंगवले व कळंबे यासुद्धा याच डब्यात उपस्थित होत्या. त्यांनी लगेचच प्रसंगावधान राखत चोरट्याला पकडले आणि वाशी पोलिसांच्या स्‍वाधीन केले. त्‍याच्याकडील ३० हजार रुपये किमतीचे सोनसाखळीही हस्तगत केली आहे. एकूणच घटनाक्रम पाहता निर्भया सरसावल्या निर्भयाच्या मदतीला असेच म्हणावे लागले. प्रसंगावधान राखत इंगवले व कळंबे या दोघींनी कोरडे यांना मदत केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा