28.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरक्राईमनामाराजस्थानात मुख्याध्यापकासह शिक्षकांनी केला विद्यार्थीनीवर बलात्कार

राजस्थानात मुख्याध्यापकासह शिक्षकांनी केला विद्यार्थीनीवर बलात्कार

Google News Follow

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत महिला शिक्षकांच्या मदतीने शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकासह ४ शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. एका गरीब कुटुंबातील मुलीला फी माफ आणि इतर शालेय खर्च शाळेकडून केला जाईल, असे आमिष दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

हे प्रकरण अलवरच्या रायसरना येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचे आहे. याप्रकरणी एसएचओ मुकेश यादव यांनी सांगितले की, पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. रिपोर्टमध्ये तिच्या वडिलांनी सांगितले की, ते ट्रक ड्रायव्हर असून बरेचदा कामानिमित्त घराबाहेर असतात आणि त्या मुलीची आई मूकबधिर आहे. त्यांची ही दुर्दैवी मुलगी दहावीला असून, गावातील एका शाळेत शिकते. अनेक दिवसांनी घरी आल्यावर मुलीने शाळा सोडली असल्याचे वडिलांना समजले. त्यावर त्याने मुलीला शाळेत जाण्यास सांगितले असता तिने नकार दिला आणि रडू लागली. त्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, शाळेतील शिक्षक गेल्या एक वर्षापासून त्याच्यासोबत चुकीचे काम करत होते.

मुलीने सांगितले की, शाळेतील दोन महिला शिक्षिका मनीषा यादव आणि अनिता कुमारी यांनी तिला मोफत गणवेश, वह्या-पुस्तक व शाळेची पूर्ण फी शाळेतून भरली जाणार असल्याचे सांगितले. आणि सुरेश या शिक्षकाच्या घरी घेऊन गेले असता तिथे आधीच शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र कुमार, शिक्षक राजकुमार आणि प्रमोद कुमार हे मद्यपान करत होते. मनीषा यादव हिने तिचे कपडे काढले. त्यानंतर चारही पुरुष शिक्षकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान दोन्ही महिला शिक्षिकांनी तिचा अश्लील व्हिडिओ बनवला.

शिक्षकांना तिने विरोध केला असता तिला त्यांनी, तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करू आणि तिला नापास करण्याची धमकी दिली. शाळेच्या मुख्याध्यापकांनीही तिला धमकावलं, यासंदर्भात घरी जाऊन सांगितले तर मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकीन. मुलगी घाबरली आणि तिने घडलेला प्रकार घरी सांगितला नाही. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तिच्यावर महिला शिक्षिकेच्या पतीसह इतरांनी सामूहिक बलात्कार केला.

हे ही वाचा:

जागतिक सरासरीपेक्षा भारतात १०% जास्त महिला वैमानिक

ठाणे स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकार करणार चौकशी

भारत अरब देशांना अन्न पुरवठा करणार

सुई न टोचता लस घेता येणार

 

या प्रकरणी पीडितेने वडिलांच्या मदतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकासह शिक्षकांविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा