32 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरदेश दुनियाहवेत असलेला जपानी अब्जाधीश अखेर जमिनीवर आला!

हवेत असलेला जपानी अब्जाधीश अखेर जमिनीवर आला!

Google News Follow

Related

कितीही माणूस मोठा झाला, श्रीमंत झाला तरी त्याचे पाय नेहमी जमिनीवर असावेत असे म्हटले जाते. जपानचा अब्जाधीश युसाकू माएझावा याचे पाय १२ दिवसांनी जमिनीवर लागले आहेत. आश्चर्य वाटले ना? असे काय घडले आहे त्याच्याबाबत?

बारा दिवसांपूर्वी युसाकूने अवकाशात भरारी घेतली होती.  गेलेला जपानी अब्जाधीश युसाकू माएझावा सोमवारी पृथ्वीवर परत आला आहे. रशियन स्पेस एजन्सी ने ८ डिसेंबर रोजी सोयुझ स्पेसक्राफ्टमध्ये माएझावाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित केले होते. बारा दिवसांनी म्हणजेच २० डिसेंबर रोजी ते पृथ्वीवर परतले. ऑनलाइन फॅशन टायकून आणि त्याचा सहाय्यक योझो हिरानो रशियन अंतराळवीर अलेक्झांडर मिसुरकिनसह कझाकस्तानमध्ये उतरले.

या तिघांनी बारा दिवस परिभ्रमण प्रयोगशाळेत घालवले. बारा दिवस त्यांनी काय केले याचे व्हिडीओ माएझावाच्या लोकप्रिय युट्यूब चॅनेलवर त्यांनी टाकले आहेत. या व्हीडीओ मध्ये त्यांनी त्यांच्या प्रेक्षकांना शून्य गुरुत्वाकर्षणात काम कसे केले हे दाखवले आहे. १३ मे २०२१ रोजी, माएझावा ने जाहीर केले होते की, तो सोयूझ मार्गे डिसेंबर २०२१ मध्ये त्याचे सहाय्यक योझो हिरानो सोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये सहलीसाठी जाणार आहे.

हे ही वाचा:

‘एकटे निवडणूक जिंकता येत नाही म्हणून शिवसेनेची जोडतोड करून सत्ता’

अँटिलिया प्रकरणातील नरेश गौरच्या सुटकेचा मार्ग मोकळा

लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या फोटोची शरम कशाला वाटायला हवी?

गेले दोन वर्ष सरकार अस्तित्वातच नाही

 

माएझावाची एलोन मस्कच्या स्पेसएक्स द्वारे संचालित २०२३ ला चंद्राभोवती मोहिमेवर आठ लोकांना घेऊन जाण्याची योजना आहे. माएझावा हे एक उत्साही पर्यटक आहेत. एक दशकाहून अधिक कालावधीतील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) प्रवास करणारा तो पहिला अंतराळ पर्यटक ठरला आहे.

पत्रकार तोयोहिरो अकियामा यांनी १९९० मध्ये मीर स्टेशनवर प्रवास केल्यानंतर अंतराळात भेट देणारे ते आणि त्यांचे सहाय्यक हे पहिले खाजगी जपानी नागरिक आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा