29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
घरविशेषयजमान परभणीसह रत्नागिरी, कोल्हापूर, औरंगाबाद बाद फेरीत

यजमान परभणीसह रत्नागिरी, कोल्हापूर, औरंगाबाद बाद फेरीत

Google News Follow

Related

यजमान परभणीसह रत्नागिरी, कोल्हापूर, औरंगाबाद यांनी “६८व्या वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेची” उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर यांनी थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली.
परभणी-पाथरी येथील कबड्डीमहर्षी बुवा साळवी क्रीडागरीत झालेल्या उपपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान परभणीने बलाढ्य ठाण्याला ४१-३३ असे रोखले. सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत खेळणाऱ्या परभणीने मध्यंतराला २३-१५ अशी भक्कम आघाडी घेतली होती. नंतर सावध पवित्रा घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. निकिता व कोमल लंगोट भगिनी आणि गौरी दहे यांचा झंजावाती खेळामुळे परभणीने हा विजय ८गुणांनी साकारला.
ठाण्याकडून चंद्रिका जोशी, माधुरी गवंडी यांनी उत्तम खेळ करीत सामन्यात चुरस निर्माण केली, पण ठाण्याला विजय मिळवून देण्यात त्या अपयशी ठरल्या. दुसऱ्या सामन्यात रत्नागिरीने रायगडचा प्रतिकार ३६-२५ असा मोडून काढला. विश्रांतीला रत्नागिरीकडे १९-१४ अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली होती. समरीन व तसरीम या बुरोंडकर भगिनी या विजयात चमकल्या. रचना म्हात्रे, तेजा सपकाळ यांचा चतुरस्त्र खेळ रायगडला पराभवापासून वाचवू शकला नाही.
कोल्हापूरने सोलापूरचा ६५-३७ असा सहज पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. स्नेहा शिंदे, पूजा जोशीलकर यांच्या नेत्रदीपक खेळामुळेच कोल्हापूरने २८गुणांच्या मोठ्या फरकाने हा सामना आपल्या नावे केला. कोल्हापूरने मध्यांतरालाच ३०-१७ अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. काजल गायकवाड, पूजा आदलिंगे सोलापूरकडून बऱ्या खेळल्या.
शेवटच्या चुरशीच्या लढतीत औरंगाबादने धुळ्याचा प्रतिकार २७-२४ असा संपुष्टात आला. मध्यांतराला दोन्ही संघ १०-१० असे बरोबरीत होते. तृप्ती अंधारे, स्वाती ढगे यांच्या संयमी खेळाला  या विजयाचे सारे श्रेय जाते. धुळ्याकडून ज्योती डफळे, आरती पाटील यांनी उत्कृष्ट खेळ करीत सामन्यातील रंगत कायम ठेवली. पण शेवटच्या क्षणी त्याचे विजयात रूपांतर करण्यात त्या अपयशी ठरल्या.
हे ही वाचा:
आज सकाळी झालेल्या सत्रातुन खालील संघांनी बाद फेरी गाठली.  अ गटातून १)पुणे,२) धुळे, ब गटातून २)मुंबई शहर, २)रायगड, क गटातून १) मुंबई उपनगर, २)सोलापूर, ड गटातून १)पालघर, २)ठाणे, इ गटातून १)परभणी, २)औरंगाबाद, फ गटातून १)कोल्हापूर, २)रत्नागिरी यांनी “६८व्या वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी” स्पर्धेची बाद फेरी गाठली होती.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा