32 C
Mumbai
Wednesday, April 29, 2026
घरबिजनेसकृषीविषयक कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांनी सांगितले

कृषीविषयक कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांनी सांगितले

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारत सरकारने संमत केलेल्या कृषीविषयक कायद्यांवर भाष्य केले आहे. गोपीनाथ यांच्यामते नवे कृषीविषयक कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत आणि यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

“भारतीय शेतीव्यवस्थेत सुधारणांची आवश्यकता आहे. नवे कृषीविषयक कायदे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकतात. परंतु गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा पुरवणेही गरजेचे आहे.” असे गीता गोपीनाथ यांनी सांगितले.

भारत सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये लागू केलेले कृषीविषयक कायदे कृषीविषयात सुधारणा करणारे आहेत. या कायद्यांतर्गत दलालांना बाजूला सारून शेतकरी थेट बाजारपेठेत माल विकू शकेल. असा दावा भारत सरकार करत आहे.

या कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने पंजाब आणि हरणामधील शेतकरी आंदोलन करत आहेत. २६ जानेवारीला आंदोलनकर्त्यांनी दिल्लीमध्ये हिंसाचार घडवून आणला होता.

या कायद्याच्या समर्थनात आजवर अनेक अर्थतज्ज्ञांनी अग्रलेख लिहिले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनींही आता या कृषीविषयक कायद्यांचे समर्थन केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीत भारतीय अर्थव्यवस्था २०२१-२२ मध्ये ११.५% टक्क्याने वाढेल असे सांगितले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा