28.9 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरविशेषकोकणच्या मातीतली गूढ ‘बायंगी’ची लोककथा मोठ्या पडद्यावर

कोकणच्या मातीतली गूढ ‘बायंगी’ची लोककथा मोठ्या पडद्यावर

अमेय वाघ मुख्य भूमिकेत

Google News Follow

Related

टीव्हीएफने ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘कोटा फॅक्टरी’ आणि ‘अॅस्पिरंट्स’सारख्या गाजलेल्या वेबसीरिजमधून वेगळ्या धाटणीच्या कथा प्रेक्षकांसमोर आणल्यानंतर आता मराठी सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री केली आहे. टीव्हीएफ मोशन पिक्चर्सच्या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून ‘बायंगी : पळायची नाही, टाळायची!’ या सिनेमातून महाराष्ट्राच्या लोककथेला विनोद, रहस्य आणि गूढतेची अनोखी फोडणी मिळणार आहे.

कोकणाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या चित्रपटाची कथा ‘बायंगी’ या एका रंजक लोककथेभोवती फिरते. नारळात अडकलेला एक अलौकिक आत्मा म्हणजे ‘बायंगी’ अशी या लोककथेत मान्यता आहे. ही बायंगी ज्याच्या ताब्यात येते, त्याला समृद्धी मिळते, अशीही धारणा आहे. मात्र या संपत्तीची किंमतही तितकीच भयानक आहे. चित्रपटात चार अविवाहित तरुणांच्या हातात अचानक बायंगी लागते आणि आयुष्य बदलण्याची संधी मिळाल्याच्या आनंदात ते मोठी स्वप्नं पाहू लागतात. मात्र त्यांच्या प्रत्येक इच्छेसोबत एक धोकादायक किंमत जोडलेली असल्याचं हळूहळू समोर येतं. त्यामुळे सुरुवातीला मजेशीर वाटणारा हा प्रवास पुढे भय, गोंधळ आणि संकटांनी भरलेला होतो.
हे ही वाचा:
सर्जरीच्या वेळी सोनू निगमने गायले रफींचे गाणे, व्हिडिओ व्हायरल

भारतात मेटाची मनमानी चालणार नाही

मुंबई-पुण्याच्या ऑफिस मार्केटला ब्रेक; बंगळुरू-हैदराबादची जोरदार आघाडी

भारत-पाक सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई; संशयित घुसखोर ठार

या सिनेमात अमेय वाघ मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत हार्दिक जोशी, मनमीत पेम आणि अविनाश खेडेकर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. ‘गुल्लक’च्या पाचव्या सीझनचे दिग्दर्शन केलेले अभय राऊत या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे टीव्हीएफची कथाकथनाची खास शैली आणि मराठी मातीत रुजलेली लोककथा यांचा संगम पडद्यावर कसा रंगतो, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

टीव्हीएफने आतापर्यंत भारतीय प्रेक्षकांना साध्या पण मनाला भिडणाऱ्या कथा दिल्या आहेत. आता मराठी भाषेतील आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीशी जोडलेल्या कथेकडे त्यांचा मोर्चा वळला आहे. ‘बायंगी : पळायची नाही, टाळायची!’ हा केवळ टीव्हीएफचा मराठीतला पहिला चित्रपट नाही, तर लोककथा, विनोद आणि गूढतेचा वेगळा प्रयोग ठरण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही; मात्र या घोषणेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एका नव्या आणि लक्षवेधी प्रयोगाची चर्चा सुरू झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा