मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शिवसेनेचा लोगो असलेल्या गाडीतून पिस्तूल दाखवून दमदाटी करण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकारचा एक व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ट्विटरवर अनेकांनी चिंता या प्रकरणी चिंता प्रकट केली.
सत्ताधाऱ्यांचा माज पाहा, कमेण्टमध्ये पोलिसांची प्रतिक्रियाही वाचा. महाराष्ट्रात गन तंत्र सुरू आहे…. https://t.co/vjmy4Rr6in
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 30, 2021
हे प्रकरण समाजमाध्यमांमधून गाजत असल्याचे लक्षात आल्यावर मुंबई पोलिसांनी त्वरीत या प्रकरणाची दाखल घेतली आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनाच या घटनेचे ‘अचूक स्थान’ पाठवण्याची विनंती केली.
कृपया अचूक स्थान पाठवावे.
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 29, 2021
पोलिसांच्या या प्रश्नावर अनेक नेटकऱ्यांनी पोलिसांना तातडीने सर्व माहिती पुरवली. यामध्ये गाडीचा नंबर, चालकाचे नाव, गाडीच्या नोंदणीची माहिती हा सर्व तपशील देण्यात आला आहे.
हे घ्या साहेब डिटेल्स pic.twitter.com/K5CZAGwmMb
— #ਸੱਦਾ_ਹੱਕ_ਏਥੇ_ਰੱਖ (@Ghulam_E_Ambani) January 29, 2021
काही नेटकऱ्यांनी माहिती पुरवण्याबरोबरच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले. तर काहींनी पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप केला.
माहिती पुरेशी आहे पण कारवाई करायची हिंमत नाही त्याचं काय
— Vikram Karandikar (@karandikarvk) January 29, 2021
काल रात्री (२९ जानेवारी) घडलेल्या या घटनेवर जेंव्हा आज सकाळी (३० जानेवारी) मुंबई पोलिसांनी ही केस पुणे पोलिसांकडे जाण्यासाठी त्यांना ट्विटमध्ये टॅग केले तेंव्हासुध्दा नेटकरी संतापले. बोरिवलीची गाडी असूनही तपस करण्यासाठी पुणे पोलिसांना का टॅग केले गेले असा सवालही काहींनी विचारला.
गाडी पुण्यातली थोडीच आहे? शिवसेनेचे लोक आहेत म्हणून तुमची हिम्मत नाहीये का काही कारवाई करायची? तसं स्पष्टपणे जाहीर सांगून तरी टाका. लोक उगाच मुंबई पोलिसांचा उदो उदो करतायत तो तरी बंद होईल.
— virtual_batman (@_tweeting_bully) January 30, 2021
दरम्यान या प्रकरणी मुंबई किंवा पुणे कोणत्याही पोलिसांनी कोणतीही कारवाई केल्याची माहिती मिळालेली नाही.