29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरविशेष२०२२ मधील इस्रोची पहिली मोहीम फत्ते

२०२२ मधील इस्रोची पहिली मोहीम फत्ते

Google News Follow

भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना म्हणजेच इस्रोने २०२२ मधील पहिली मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. आज १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.५९ वाजता सतिश धवन अंतरिक्ष केंद्र येथून पोलर सॅटेलाईट लॉंच व्हेईकल (PSLV-C52) यशस्वी प्रक्षेपित करण्यात आले. इस्त्रोने आज सकाळी PSLV-C52 मिशन अंतर्गत तीन सॅटेलाईट लाँच केले आहेत.

२०२२ ची पहिली मोहीम यशस्वी झाल्याने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला. PSLV-C52 च्या अनुसार पर्यवेक्षण उपग्रह (EOS)-04 अंतराळात पाठवण्यात आले. इस्त्रोने या मोहिमेची माहिती यापूर्वी दिली होती. या मोहिमेत EOS-04 रडार इमेजिंगचा समावेश आहे. यामुळे शेती, मातीमधील आर्द्रता, जलविज्ञान, वनसंपदा आणि वृक्षारोपण, पूर आणि हवामानाच्या स्थितीसंबधी हाय रिझोल्यूशनचे फोटोज उपलब्ध होणार आहेत. PSLV-C52 चे अंतराळात यशस्वी उड्डाण श्रीहरीकोटा मधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या करण्यात आले.श्रीहरिकोटा मधून आज सकाळी ५२९ किमी उंचीच्या सूर्य-समकालिक ध्रुवीय कक्षेत उपग्रहाचे उड्डाण झालं.

हे ही वाचा:

उत्तराखंडमध्ये पुष्कर ठरणार Fire?

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

धक्कादायक! चंद्रभागेचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक

जागतिक रेडिओ दिन; रेडिओ हे लोकांना जोडणारे उत्तम माध्यम

इस्त्रो आगामी काळात तीन महिन्यात आणखी पाच लाँचिंगच्या तयारीत आहेत. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार या यशस्वी मोहिमेमुळे इतर योजनांना त्याचा फायदा होईल याशिवाय येत्या काळात चंद्रयान-३ आणि गगनयान यासह १९ सॅटेलाईट आगामी काळात लाँच करण्यात येणार आहेत. EOS-504, यानंतर PSLV-C53, OCEANSAT-3, INS2B या उपग्रहांचे मार्चमध्ये प्रक्षेपण केले जाईल. तर, एप्रिलमध्ये SSLV-D1 मायक्रोसॅट लाँचिंग केले जाईल, अशी माहिती आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा