भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना म्हणजेच इस्रोने २०२२ मधील पहिली मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. आज १४ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.५९ वाजता सतिश धवन अंतरिक्ष केंद्र येथून पोलर सॅटेलाईट लॉंच व्हेईकल (PSLV-C52) यशस्वी प्रक्षेपित करण्यात आले. इस्त्रोने आज सकाळी PSLV-C52 मिशन अंतर्गत तीन सॅटेलाईट लाँच केले आहेत.
२०२२ ची पहिली मोहीम यशस्वी झाल्याने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला. PSLV-C52 च्या अनुसार पर्यवेक्षण उपग्रह (EOS)-04 अंतराळात पाठवण्यात आले. इस्त्रोने या मोहिमेची माहिती यापूर्वी दिली होती. या मोहिमेत EOS-04 रडार इमेजिंगचा समावेश आहे. यामुळे शेती, मातीमधील आर्द्रता, जलविज्ञान, वनसंपदा आणि वृक्षारोपण, पूर आणि हवामानाच्या स्थितीसंबधी हाय रिझोल्यूशनचे फोटोज उपलब्ध होणार आहेत. PSLV-C52 चे अंतराळात यशस्वी उड्डाण श्रीहरीकोटा मधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या करण्यात आले.श्रीहरिकोटा मधून आज सकाळी ५२९ किमी उंचीच्या सूर्य-समकालिक ध्रुवीय कक्षेत उपग्रहाचे उड्डाण झालं.
#WATCH | Indian Space Research Organisation launches PSLV-C52/EOS-04 from Satish Dhawan Space Centre, Sriharikota
(Source: ISRO) pic.twitter.com/g92XSaHP9r
— ANI (@ANI) February 14, 2022
हे ही वाचा:
उत्तराखंडमध्ये पुष्कर ठरणार Fire?
एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा
धक्कादायक! चंद्रभागेचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक
जागतिक रेडिओ दिन; रेडिओ हे लोकांना जोडणारे उत्तम माध्यम
इस्त्रो आगामी काळात तीन महिन्यात आणखी पाच लाँचिंगच्या तयारीत आहेत. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार या यशस्वी मोहिमेमुळे इतर योजनांना त्याचा फायदा होईल याशिवाय येत्या काळात चंद्रयान-३ आणि गगनयान यासह १९ सॅटेलाईट आगामी काळात लाँच करण्यात येणार आहेत. EOS-504, यानंतर PSLV-C53, OCEANSAT-3, INS2B या उपग्रहांचे मार्चमध्ये प्रक्षेपण केले जाईल. तर, एप्रिलमध्ये SSLV-D1 मायक्रोसॅट लाँचिंग केले जाईल, अशी माहिती आहे.