25 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरदेश दुनियाचीनकडे सेन्सॉरशिपची तगडी यंत्रणा... कॅलिफोर्नियाच्या संशोधकाचा दावा

चीनकडे सेन्सॉरशिपची तगडी यंत्रणा… कॅलिफोर्नियाच्या संशोधकाचा दावा

Google News Follow

Related

कोरोना साथीच्या काळात चीनने बरीच लपवाछपवी केली. हे शक्य झाले कारण चीनकडे सरकारला नको असलेली माहीती दडपण्यासाठी सेन्सॉरशिपची मोठी यंत्रणा असल्याचा दावा कॅलिफोर्नियामधील एका तज्ज्ञाने केला आहे.

चीनमध्ये पाश्चात्त्य सोशल मीडियावर बंदी आहे, चीनी नागरीक देशी सोशल मीडियाचा वापर करतात. चीनमधील साम्यवादी सरकार या देशी सोशल मीडियाचा वापर साम्यवाद पसरवण्यासाठी करत असल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करून सरकारने समाजमाध्यमांवर आपली घट्ट पकड बसवली आहे. नको असलेली माहीती दडपण्याची जय्यत यंत्रणा चीनकडे आहे. 

कॅलिफोर्नीया विद्यापीठातील संशोधक क्झाओ क्विआंग यांनी सांगितले की, चीनकडे सुसुत्रता आणि संघटीत अशी सेन्सॉरची मोठी राजकीय यंत्रणा अस्तित्त्वात आहे. एखादी माहीती केवळ डिलीट करण्यापुरती ही यंत्रणा मर्यादीत नसून ठराविक माहीती मोठ्या प्रमाणात पसरवण्याचे कामही ही यंत्रणा करते. याची व्याप्ती प्रचंड मोठी असून, जगात इतर कोणत्याच देशात अशी अशी यंत्रणा उपलब्ध नाही.

फेब्रुवारीच्या ७ तारखेला, कोरोना रोगाबद्दल प्रथम माहिती देणाऱ्या डॉक्टर ली वेनलिआंग याचा कोरोनाने मृत्यु झाल्याची बातमी इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने पसरू लागली. नव्या गूढ आजाराबद्दल धोक्याची घंटा वाजवल्यानंतर चायनाच्या दमनकारी यंत्रणेने त्यांच्यावर लोकांत घबराट पसवल्याचा आरोप ठेवला होता. त्यांचा कोरोनानेच मृत्यू झाल्याचे वृत्त पसरु लागल्यानंतर या प्रकाराला आवर घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात चीनची हीच यंत्रणा कामाला लागली होती. 

चायनाने वृत्तसंस्थांना हे वृत्त वाचकांपर्यंत पोहोचणार नाही असे आदेश दिले होते. सोशल मीडियाशी संबधित कंपन्यांना डॉ. ली वेनलियांग हे शब्द असणाऱ्या पोस्ट काढून टाकण्यास सांगितले. त्यांच्यासोबत, आपली इंटरनेट वापरकर्त्यांची प्रचंड मोठी टोळी सक्रिय केली ज्यांनी समाजमाध्यमांवर वेगळ्याच विषयांचा मारा सुरू करून सर्व वापरकर्त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविले. या वापरकर्त्यांनी कोणत्या प्रकारच्या पोस्ट कराव्यात याबाबतची स्वतंत्र सूचनावली चायना सरकारने जारी केली होती. द न्यूयॉर्क टाईम्समध्ये याबाबत सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध झाला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा