33 C
Mumbai
Saturday, December 20, 2025
घरक्राईमनामामनसे कार्यकर्त्यांनी आयपीएल खेळाडूंच्या बसची केली तोडफोड

मनसे कार्यकर्त्यांनी आयपीएल खेळाडूंच्या बसची केली तोडफोड

Google News Follow

Related

आयपीएल २०२२ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २६ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने सुरू होणार्‍या आयपीएल २०२२ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत ताज हॉटेलजवळ उभ्या असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बसवर हल्ला केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित केला आहे. आयपीएलमध्ये वाहतूकदारांना कंत्राट देण्यावरून मनसेने यावेळी गदारोळ केला. आयपीएलने महाराष्ट्रातील वाहतूकदारांना बसचा ठेका न देता दिल्लीतील वाहतूकदारांना ठेका दिल्याचा आरोप मनसेने केला आहे.

काल रात्री उशिरा मनसेने मुंबईतील ताज हॉटेलजवळ उभ्या असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बसेसची तोडफोड केली आणि त्यानंतर बसमध्ये पोस्टरही चिकटवण्यात आले. या घटनेनंतर याप्रकरणी कारवाई करत मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी पाचहून अधिक अज्ञातांविरुद्ध कलम १४४, १४७, १४९ आणि कलम ४२७ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

येत्या काळात महाराष्ट्रात मुंबई महानगर पालिकेसह अनेक नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत आगामी निवडणुकीसाठी मनसेने मराठी माणसाचा मुद्दा आणि अश्या बऱ्याच मुद्द्यांवर आक्रमक होण्यास सुरवात केली आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण

महाराष्ट्र गुजरात सीमावाद लवकरच संपणार

काय आहे नेमके प्रकरण?

आयपीएलमध्ये सहभागी होणार्‍या सर्व खेळाडूंना हॉटेलमधून मैदानावर आणि मैदानावरून हॉटेलपर्यंत नेण्यासाठी बसेसचा वापर केला जातो. या बसेस महाराष्ट्राबाहेरून आणल्या जातात, त्यामुळे राज्यातील वाहतूकदारांच्या कमाईवर परिणाम होत असल्याचा, आरोप मनसेने केला. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी बाहेरून येणाऱ्या या बसेसची तोडफोड करत गोंधळ घातला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी अनेकवेळा स्थानिक वाहतूकदारांनाच आयपीएल दरम्यान खेळाडू आणण्याचे आणि नेण्याचे काम दिले जावे, अशी मागणी केली होती, मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा