विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. बोगस मजूर प्रकरणी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. बोगस मजूर प्रकरणी सध्या प्रवीण दरेकर यांची चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात प्रवीण दरेकरांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
“आधीपासूनच सांगत होते की याप्रकरणी जो गुन्हा दाखल केला आहे, त्यानुसार ही केस उभीर राहू शकत नाही. तसेच न्यायालयाने या केससंदर्भातील मुद्देही न ऐकता हे ठरवलं की, दरेकर यांना कोठडीत चौकशीची गरज नाही. त्यामुळं न्यायालयाने प्रवीण दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे,” अशी माहिती प्रवीण दरेकर यांच्या वकिलांनी दिली आहे.
हे ही वाचा:
तोंडी आरोपांची राळ उडवणाऱ्या राऊत यांच्याकडून नवे आरोप
नीरव मोदीचा सहकारी सुभाष शंकरला इजिप्तमध्ये पकडले
पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल
पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना!
मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांची दोन वेळा चौकशी केली होती. प्रवीण दरेकर यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. तसेच सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. तसेच पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. तर, उच्च न्यायालयात सरकार तोंडघशी पडणार असल्याचा दावा दरेकर यांच्या वकिलांनी केला होता. त्यानंतर आता न्यायालयाने प्रवीण दरेकर यांना मोठा दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.







