23 C
Mumbai
Thursday, January 15, 2026
घरबिजनेस....म्हणून अमेरिकेत वाढली महागाई!

….म्हणून अमेरिकेत वाढली महागाई!

Google News Follow

Related

जगातील सर्वात मोठी आणि मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश अमेरिका सध्या महागाईचा सामना करतोय. ४० वर्षानंतर अमेरिकेतील महागाई पहिल्यांदाच साडे आठ टक्क्यांवर पोहचलीय. अमेरिकेच्या महागाईचा परिणाम भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर होतोय. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होतेय. या घसरणीला अनेक कारण असली तरी महत्वाचं कारण म्हणजे जागतिक बाजारातील घसरण हे आहे. अमेरिकेत महागाई वाढत असल्याने पुन्हा एकदा अमेरिकेच्या फेडरल रिजर्व्ह बँकेवर व्याजदरवाढीचा दबाव येतोय. अमेरिकेमध्ये महागाई वाढतेय त्यामुळे अमेरिकेत व्याजदर वाढवला आहे.

१९८१-८२ साली अमेरिकेची महागाई या स्थरावर पोहचली होती. त्यानंतर यावर्षी अमेरिकेची महागाई ८ पूर्णांक ६ टक्क्यांवर पोहचलीय.आता लवकरच वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याज दरात वाढ केली आहे. व्याजदरात वाढ करून देखील महागाई सात टक्क्यांच्या खाली येण्याची शक्यता नसल्याचे मत तज्ज्ञांनी वर्तवलंय.

एवढ्या वर्षांनंतर अमेरिकेची महागाई कशी वाढली?

या महागाईची सुरुवात झाली ती २०२० मध्ये जेव्हा कोरोना महामारी आली. तेव्हा अनेक व्यवसाय बंद झाल्यामुळे अनेक लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. आणि लॉकडाऊन लागल्यामुळे ग्राहकांची संख्यादेखील कमी झाली. याशिवाय महामारीत अनेक कंपन्यांनी त्यांची गुंतवणूक काढून घेतली यासगळ्यामुळे महामारीत अमेरिकेचा जीडीपी ३१ टक्क्यांनी घसरला होता. तर भारताचा जीडीपी २४ टक्क्यांनी घसरला होता. तेव्हा भारत सरकारने जशी जनतेला मदत जाहीर केली होती तशीच अमेरिकेन सरकारनेही जनतेला मदत केली होती. कोरोना काळात भारतसारखं अमेरिकेतही कोरोनात मदत म्हणून जनतेसाठी पॅकज जाहीर केलं. अमेरिकेत १ पूर्णांक ९ ट्रिलियन डॉलर त्यावेळी अमेरिकन सरकारनं पॅकज दिल होत. भारतात जे लोकांसाठी पॅकज जाहीर झालं ते लोकांना धान्य किंवा इतर सोयी सुविधांच्या माध्यमातून दिल गेलं मात्र अमेरिकेत थेट लोकांच्याच हातात पैसे दिल्याचं सांगितलं जात होत. यांच्यामुळं अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारण्याऐवजी आणि आणखी घसरू लागली. फेडरल रिझर्व्हने सुद्धा तेव्हा रेपो रेट शून्य टक्क्यांवर आणला होता. तेव्हाही सगळं नीट चाललं होत अमेरिकेत जस जस लसीकरण पार पडत गेलं तशी अमेरिकेची अर्थव्यवस्था थोडीफार पूर्वपदावर येऊ लागली. मात्र अमेरिकेत अचानक मागणी वाढू लागली. मागणी वाढण्याचे कारण म्हणजे फेडरल रिझर्व्ह बँकेने शून्य रेपो रेट केल्याने लोक कर्ज घेऊ लागली आणि त्यामुळे लोकांच्या मागण्या वाढू लागल्या आणि मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नव्हता. आणि जेव्हा मागणी वाढते तेवढ्या प्रमाणात पुरवठा झाली नाही तर वस्तूंच्या किमती वाढतात. तेच अमेरिकेत आता झालंय. त्यामुळे आता मागणी आणि पुरवठ्याचा ताळमेळ होईल तेव्हा कुठे अमेरिकेची अर्थव्यस्था पूर्वपदावर येईल असं म्हटलं जातंय. याशिवाय सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होतेय. सध्या कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १२० डॉलरच्या आसपास आहे. या सर्वाचा अमेरिकन बाजरावर परिणाम होतोय.

अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे अमेरिकेतील प्रत्येक घडामोडीचा परिणाम जगभरातील बाजारावर दिसून येतो. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकने व्याजदर ७५ बेस पॉईंट्सनी वाढवला आहे. अमेरिकेने व्याजदरात वाढ केल्यास रुपयाच्या मूल्यामध्ये आणखी घसरण होऊ शकते. भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी प्रमुख पाच देशांमध्ये अमेरिकेचा समावेश आहे. तसेच भारताचे आयटी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर अमेरिकेवर अवलंबून आहे यावर देखील अमेरिकेच्या महागाईचा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेच्या व्याजदराचा परिणाम इतर देशांप्रमाणे भारतीय शेअर बाजारावरसुद्धा होतोय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारतीय शेअर बाजारातील परदेशी गुंतवणूक कमी होतेय. अश्या वेळी व्याजदर आणखी वाढल्यास शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची आणखी विक्री वाढू शकते. शेअर बाजारावर विक्रीचा दबाव वाढल्यास सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. भारताच्या शेअर बाजाराप्रमाणेच युरोपियन मार्केट, जपान, हाँगकाँग, चीन आणि तैवानचे शेअर बाजारही घसरलेत. एवढ्या सगळ्या गोष्टी आणि याहीपेक्षा जास्त गोष्टी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा