28.7 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरक्राईमनामाकिशोरी पेडणेकरांना पून्हा त्याच नावाने धमकीचे पत्र

किशोरी पेडणेकरांना पून्हा त्याच नावाने धमकीचे पत्र

Google News Follow

शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले आहे. या पत्रात अश्लील भाषेत शिवीगाळ करत किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे पत्र रायगडहून आल्याची माहिती मिळत आहे. या पत्रात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर यांना हे पत्र विजेंद्र म्हात्रे या नावाच्या व्यक्तीने बंद लिफाफ्यातून पाठवले आहे. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना अश्लील भाषेत शिविगाळ करण्यात आली आहे. तसेच या पत्रातून त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. सरकार, पडू देत मग बघून घेऊ, असा उल्लेखही या पत्रात केला आहे. एवढंच नव्हे तर, अजित पवार यांनीच महाविकास आघाडी सरकार पडण्यास सांगितले आहे, असंही या पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये भीषण आग

सरकारला आली जाग! औरंगाबादचे संभाजीनगर करणार

‘अल्ट न्यूज’चे सहसंस्थापक मोहम्मद जुबेर यांना अटक

धमकीचे पत्र मिळताच किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. या पत्रात बलात्कार करण्याचीही धमकी त्यांना देण्यात आली आहे. मागच्यावेळीही याच नावाने आणि याच पत्त्याने किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र आले होते. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यावेळी तपास करूनही पोलिसांना आरोपी सापडला नाही. पत्रात नमूद असलेले नाव आणि पत्ता बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं होत यावेळीही तेच नाव आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा