27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरराजकारणआम्ही उद्या मुंबईत येणार; कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

आम्ही उद्या मुंबईत येणार; कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

Related

बंडखोरी करून गुवाहाटी येथे आठवडाभरापासून मुक्काम ठोकलेल्या सर्व आमदारांनी आज माँ कामाख्या देवीचे दर्शन घेतले. यावेळी या आमदारांसह पोलीस तैनात होते. प्रत्येक आमदाराला स्वतंत्र सुरक्षा पुरवण्यात आली होती.

“आमच्याकडे ४० आधिक १० असे ५० आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची काळजी नाही. आम्हाला कोणी रोखू शकत नाही. या देशात संविधानापुढे कोणी जाऊ शकत नाही असे म्हणत उद्या सकाळी सर्व आमदार मुंबईत पोहोचतील,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उद्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

“आम्ही श्रद्धेने कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. एक वेगळा आनंद, समाधान सर्व आमदारांना मिळालं आहे. कोणत्याही आमदारावर जबरदस्ती केल्याचं तुम्ही इथे पाहिलं का? सर्वजण मोकळेपणाने फिरत होते,” असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

किशोरी पेडणेकरांना पून्हा त्याच नावाने धमकीचे पत्र

महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये भीषण आग

सरकारला आली जाग! औरंगाबादचे संभाजीनगर करणार

दरम्यान, राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारला उद्या, ३० जून रोजी सकाळी ११ वाजता बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. या विरोधात शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर संध्याकाळी पाच वाजता तातडीची सुनावणी पार पडणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा