24 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरक्राईमनामापुण्यातील या तिघांनी नाकारली होती बाबा सिद्दीकीच्या हत्येची सुपारी

पुण्यातील या तिघांनी नाकारली होती बाबा सिद्दीकीच्या हत्येची सुपारी

पैशावरून होत होता वाद

Google News Follow

Related

माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झियाउद्दीन ऊर्फ बाबा सिद्धीकी यांच्या हत्याप्रकरणात गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केलेल्या रुपेश मोहोळ (२२), करण साळवे (१९) आणि शिवम कोहाड (२०) यांना सुरुवातीला बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होते. पण, बाबा सिद्दीकी यांचे असलेले मोठे नाव आणि हत्येसाठी मागितलेल्या मोठ्या रकमेवरुन झालेल्या वादानंतर त्यांनी यातून काढता पाय घेतल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात समोर आले आहे.

वांद्रे पूर्वेकडील खेरनगर परिसरात १२ ऑक्टोबरच्या रात्री बाबा सिद्दीकी यांच्या गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखा तपास करत असून गुन्हे शाखेने आतापर्यंत १४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील मोहोळ, साळवे आणि कोहाड यांना गुन्हे शाखेने बुधवारी रात्री उशिरा अटक केली. पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याचा फोटो रुपेश वापरत होता. तर, एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या तिघांची बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी निवड करण्यात आली होती.

हे ही वाचा:

बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार!

पालिकेचे खबरी समजून तिघांना विवस्त्र करत गुप्तांगांना दिले शॉक

इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, अकासा एअरच्या ८५ विमानांना धमक्या

अल जझीराचे सहा पत्रकार हमास आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादचे दहशतवादी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे काम राम कानोजिया आणि नितीन सप्रे यांना देण्यात आले होते. मोहोळ, साळवे आणि कोहाड या तिघांची राम कानोजिया आणि नितीन सप्रे यांच्या सोबत ओळख होती. त्यामुळे, कानोजिया आणि सप्रे यांनी या तिघांना बाबा सिद्दीकी हत्येचे काम दिले. तिघेही पुण्यातून दोन वेळा डोंबिवलीमध्ये आले होते. कळंबोली आणि अन्य ठिकाणी भेटले.

कानोजिया आणि सप्रे यांच्यासोबत मोहोळ, साळवे आणि कोहाड यांनी बाबा सिद्दीकी यांच्या घर कार्यालयांची रेकी केली. माजी राज्यमंत्री सिद्दीकी यांचे मोठे नाव असल्याने तिघांनी अधिक रक्कम मागितली. पुढे, बाबा सिद्दीकी यांची हत्या करणे मोठी बाब असल्याने आणि पैशांवरुन झालेल्या वादातून त्यांनी माघार घेतली. नंतर शिवा, कश्यप आणि गुरमेल यांना काम देण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे.
……………………………………………………………………..

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा