26 C
Mumbai
Saturday, November 9, 2024
घरक्राईमनामाइंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, अकासा एअरच्या ८५ विमानांना धमक्या

इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा, अकासा एअरच्या ८५ विमानांना धमक्या

गेल्या १० दिवसांपासून धमक्यांमुळे २५० हून अधिक उड्डाणे प्रभावित

Google News Follow

Related

विमानांना धमक्या मिळण्याचे सत्र अजूनही सुरूचं असून ही धमक्यांची मालिका थांबत नसल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक फ्लाइट्सला बॉम्बच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारीही तब्बल ८५ विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा आणि अकासा एअरच्या किमान ८५ फ्लाइट्सना धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या १० दिवसांपासून या धमक्यांमुळे २५० हून अधिक उड्डाणे प्रभावित झाली आहेत.

एकाच वेळी ८५ विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ज्या विमानांना या धमक्या मिळाल्या आहेत त्यात एअर इंडियाची २०, विस्ताराची २०, इंडिगोची २५ आणि अकासाची २० विमाने आहेत. यासह, गेल्या १० दिवसांपासून या धमक्यांमुळे २५० हून अधिक उड्डाणे प्रभावित झाली आहेत. याआधी १७० हून अधिक फ्लाइट्सना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्यापैकी बहुतेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आले होते. या धमक्या नंतर खोट्या ठरल्या, ज्यामुळे शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी आणि विमान वाहतूक अधिकाऱ्यांसाठी सुरक्षेची डोकेदुखी निर्माण झाली आहे.

तपासणी दरम्यान एकाही विमानात संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. मात्र या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय प्रवाशांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विमानांना दररोज मिळणाऱ्या धोक्यांबाबत केंद्र सरकारही गंभीर असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानांना बॉम्बफेक करण्याच्या सततच्या धमक्यांमुळे आतापर्यंत ५०० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

हे ही वाचा : 

जस्टिन ट्रुडो राजीनामा द्या! स्वपक्षातील खासदारांनीच केली मागणी

प्रियांका गांधी यांची डोळे दिपवणारी संपत्ती, बहुधा लग्नात आहेर म्हणून आईने दिली असावी!

‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर १७० हून अधिक रेल्वे रद्द; कोलकातामधील विमान वाहतूक स्थगित

जम्मू- काश्मीरमध्ये १९ वर्षीय स्थलांतरित मजुरावर दहशतवादी हल्ला

एअरलाइन्स कंपन्या त्यांची उड्डाणे त्यांच्या नियोजित विमानतळांऐवजी जवळच्या विमानतळांवर उतरवतात, ज्यामुळे इंधनाचा वापर जास्त होतो. विमानाची पुन्हा तपासणी करणे, प्रवाशांना हॉटेलमध्ये बसवणे आणि त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्याची व्यवस्थाही करावी लागेल. एअरलाइन्स ज्या विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करतात तिथे पार्किंग शुल्क देखील भरतात. विमान प्रवाशांसाठी चहा-पाण्यासह जेवणाची व्यवस्था करते, यामुळे कंपन्यांना मोठ्या तोट्याला सहन करावे लागत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा