27.7 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरक्राईमनामापाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न

पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न

Google News Follow

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदू मुलीचे धर्मांतर करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका सोळा वर्षीय मुलीचे आधी धर्मांतर केले. नंतर मुस्लिम तरुणाशी जबरदस्तीने तिचे लग्न लावण्यात आले आहे. लग्न झाल्यापासून मुलीबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या घटनेच्या निषेधार्थ तेथील लोकांनी नवाबशाह येथील माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या घराबाहेर निदर्शने केली आहेत. हिंदू मुलीचा शोध लवकर लावावा, अशी मागणी लोकांनी केली आहे.

अपहरण केलेल्या हिंदू मुलीचे नाव करीना असे आहे. तिचे पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील दादू काझी अहमद शहरातील उन्नर परिसरातून आठवड्याभरापूर्वी अपहरण करण्यात आले होते. पाकिस्तानात अशा घटना सर्रास घडतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात हिंदू मुलींचे धर्मांतर करून मुस्लिमांशी लग्न केले जाते. मुलीचे अपहरण करून ते प्रेमप्रकरण असल्याचे भासवले जाते.

हे ही वाचा:

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

अतिवृष्टीमुळे ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

अध्यक्ष राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू

मुख्यमंत्री शिंदेंकडून वसई दुर्घटनेतील मृतांना ६ लाखांची मदत जाहीर

पाकिस्तानी पोलीस अशा प्रकरणांमध्ये स्थानिक मौलवींच्या दबावाखाली काम करतात. या घटनेतही असाच प्रकार घडला असून, पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या पोलिसांनी या घटनेचा संबंध प्रेमप्रकरणाशी जोडत सांगितले की, हिंदू तरुणीचे खलील रहमान जोनो नावाच्या मुस्लिम तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि ती मुलगी त्याच्यासोबत पळून गेली आहे. दोघांनी कराची कोर्टात लग्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे. मात्र, यावेळी मुलगी कुठे आहे, याबाबत मुलीच्या कुटुंबीयांना काहीही सांगण्यात आलेले नाही. त्याचवेळी, आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, जेणेकरून त्यांना त्यांची मुलगी लवकर मिळेल, यासाठी लोक त्यांच्या घरासमोर निदर्शने करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा