30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरराजकारणअसंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

Google News Follow

Related

संसदेचं पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या आधी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसाठी असंसदीय शब्दांची यादी लोकसभा सचिवालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. या असंसदीय शब्दांना लोकसभा आणि राज्यसभेत वापरणं असंसदीय मानलं जाणार आहे.

सरकारवर टीका करताना यादीतले शब्द वापरता येणार नसल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यामुळे लोकसभा सचिवालयाच्या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

हे शब्द वापरता येणार नाहीत-

भ्रष्ट, बाल बुद्धी, जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद, हरामी, काळे सत्र, दलाल, खून की खेती, नौटंकी, हुकूमशहा, खलिस्तानी, हुकूमशाही, अराजकतावादी, देशद्रोही, गिरगिट, काळा दिवस, काळाबाजार, घोडेबाजार, बदनामी, संवेदनाहीन, जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, बाल बुद्धी, शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड, अक्षम, शकुनी, लॉलीपॉप, चांडाल, गुल खिलाए, पिट्टू, कोयला चोर, गोरु चोर, चरस पीते हैं, दादागीरी, बेचारा, सांड, विनाश पुरुष, घडियाली आंसू, अपमान, गूंस, असत्य, अंहकार, खरीद फरोख्त, लैंगिक छळ यासारखे शब्द या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती तसेच पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून काही शब्दांना आणि वाक्यांवर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

ही वाक्ये वापरता येणार नाहीत-

“आपण माझा वेळ वाया घालवत आहात”, “तुम्ही आमचा गळा दाबून टाका”, “खुर्चीला कमजोर केले आहे”, “ही खुर्ची सदस्यांचे संरक्षण करु शकत नाही”, अशा वाक्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

अतिवृष्टीमुळे ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

अध्यक्ष राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू

मुख्यमंत्री शिंदेंकडून वसई दुर्घटनेतील मृतांना ६ लाखांची मदत जाहीर

मुंबई महानगर क्षेत्रातील पहिले इको- टुरिझम गाव विरारमध्ये!

लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाच्या प्रक्रियेत जर अध्यक्षांना एखादा शब्द अपमानजनक किंवा असंसदीय वाटला तर तो शब्द हटवण्यासाठी ते आदेश देतात. तर नियम ३८१ नुसार सभागृहाच्या कार्यवाहीचा एखादा भाग हटवायचा असेल तर तो अध्यक्षांच्या आदेशाने हटवण्यात येतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा