28.7 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरराजकारणशिवसेनेच्या १२ खासदारांना Y दर्जाची सुरक्षा

शिवसेनेच्या १२ खासदारांना Y दर्जाची सुरक्षा

Google News Follow

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेत मोठी फूट पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहेत. जवळपास १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून या खासदारांना Y दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

खासदार हेमंत गोडसे, कृपाल तुमाने यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इतर खासदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खासदारांचे कार्यालय आणि घराला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आज दुपारनंतर शिंदे आणि समर्थक खासदारांची पत्रकार परिषद होत आहे.

हे ही वाचा:

“शरद पवारांनी वेळ साधून शिवसेना फोडली”

एकनाथ शिंदेंकडून शिवसेना भवनावर दावा?

मुंबईच्या माजी आयुक्तांची सीबीआयकडून चौकशी

गायक, गझलकार भूपिंदर सिंह यांचे निधन

त्यानंतर आता थेट शिवसेना भवनावर दावा करणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने ‘टीव्ही ९’ने दिली होती. तसेच स्वतःचीच शिवसेना ही मूळ शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दोन तृतीयांश आमदारांनी बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पाठींबा देणाऱ्या आमदारांची, नगरसेवकांची, पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. खासदारही आता एकनाथ शिंदे यांची साथ देत असल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा