28 C
Mumbai
Thursday, December 18, 2025
घरविशेषराज्यातील नऊ धरणे १०० टक्के भरली!

राज्यातील नऊ धरणे १०० टक्के भरली!

Google News Follow

Related

जूनमध्ये खंड पडल्यानंतर जुलै महिन्यात मात्र राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पाऊस पडला. राज्यातल्या अनेक भागात अद्यापही पूरस्थिती कायम आहे. मान्सूनचे आगमन उशीरा होऊन देखील राज्यातल्या धरणांच्या पाणीसाठ्यात अल्पावधीत लक्षणीय वाढ झालेली आहे. निम्न मानार ,कवडास ,असोळामेंढा,दिना, भाम ,वाघाड, खडकवासला, बारवी, मोडकसागर ही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. आठ धरणांमध्ये ९० टक्के जलसाठा आहे.

महाराष्ट्रात आजवर सरासरीच्या ४५% जास्त पाऊस बरसला आहे चार महिन्यांच्या पावसाळी मौसमापैकी केवळ दीडच महिना झालेला असल्याने पुढील काळात राज्यातील सर्व धरणे भरतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे विशेष म्हणजे कोकण आणि मध्य महाराष्ट्राबरोबरच खानदेश, मराठवाडा या विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये ५८ टक्के तर कोकण विभाग ८५.४ टक्के जलसाठा झाला आहे. राज्यातील सहाही विभागांमधील मोठ्या धरणांतील जलसाठा तब्बल ६६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

हे ही वाचा:

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार

महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, एकनाथ शिंदेंच्या बाजूने केंद्रीय आयोगाला पत्र

राज्यातील काटेपूर्णा, वाण, बेंबळा, बावनथडी, कालीसरार, मुळा, वाकी, पालखेड, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, नीरा देवघर, टेमघर, धोम, कोयना, भीमा-उजनी, ठोकरवाडी टाटा ही १६ धरणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने भरली आहेत, पेणटाकळी, येलदरी, निम्न तेरणा, निम्न दुधना, पुजारीटोला, खिडसी, निम्नवर्धा, वाघूर, दारणा, गंगापूर, दुधगंगा, डिंभे, भाटघर, पानशेत, वरसगाव, पवना, वारणा, उरमोडी, कन्हेर ही तर १९ धरणे ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत.

आठ धरणांत ९० टक्क्यांपेक्षा अधिक साठा

कामठीखैरी -गिरणा -चासकमान -येडगाव -भावली -वीर -तानसा -मध्य वैतरणा या आठ धरणे ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा