28.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरराजकारण"अमिताभ बच्चन के सम्मान मे आरपीआय मैदान मे"

“अमिताभ बच्चन के सम्मान मे आरपीआय मैदान मे”

Google News Follow

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भूमिकेला विरोध केला आहे. ते पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये बोलत असताना त्यांनी, “अमिताभ बच्चन तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है.” असे विधान केले.

रामदास आठवले यांनी अमिताभ बच्चन यांना पाठिंबा दर्शवत, “अमिताभ बच्चन के सम्मान मे आरपीआय मैदान मे” असा नारा दिला. “आरपीआयचे कार्यकर्ते जमा होऊन त्यांना अमिताभ बच्चन पाठिंबात देतील. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर दबाव आणला जात असेल तर आरपीआय त्यांना संरक्षण देईल.” असे आठवले म्हणाले. नाना पटोले यांनी त्यांची भूमिका बदलावी, असे आवाहनही त्यांनी केले.

हे ही वाचा:

“अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचे चित्रपट बंद पाडू” – नाना पटोले

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे महाराष्ट्रामध्ये शूटिंग करू देणार नाही, अशी धमकी दिली होती. आरपीआयने अमिताभ बच्चन यांच्या समर्थनार्थ जुहू जलसा बंगलाच्या समोर मोर्चा काढून अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे समर्थन केले. आरपीयआयच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली.

नाना पटोले यांनी दिलेल्या या धमकीवर भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा