33 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरराजकारणएकनाथ शिंदेंकडे नगरविकास तर फडणवीसांकडे अर्थ व गृह

एकनाथ शिंदेंकडे नगरविकास तर फडणवीसांकडे अर्थ व गृह

मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास, फडणवीसांकडे अर्थ व गृह

Google News Follow

Related

मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिंदे सरकार मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर झालं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी संध्याकाळी खातेवाटपाची घोषणा केली. या नव्या खातेवाटपानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ३० जून रोजी घेतली. यासोबतच शिंदे गटातील ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु खाते वाटप झालेले नसल्याने पुन्हा विरोधकांच्या टीकेला सरकारला सामोरे जावे लागले होते. शिंदे सरकारचा ३९ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला पण खातेवाटप रखडले होते. खातेवाटप कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती.

संभाव्य खाते वाटपाची यादी सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. आमदारांनीही स्वत: आपल्याकडे येणाऱ्या खात्याची संभाव्यता सांगण्यास सुरूवात केली होती, परंतु शिंदे आणि फडणवीस सरकारकडून त्यावर शिक्कामोर्तब होत नव्हते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला खाते वाटपाची यादी अंतिम झाली. ही यादी राज्यपाल भजभगतसिंग कोश्यारी यांच्याकड पाठवण्यात आली. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर एक दोन दिवसात खातेवाटप जाहीर होण्याची चर्चा रंगली होती. पण अखेर रविवारी संध्याकाळीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं.

हे ही वाचा:

स्टॉक मार्केटमधील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या

धक्कादायक! जळगावमध्ये भावाकडून बहिणीसह प्रियकराची हत्या

राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी राज्य सरकारला खाते वाटप करणे अगत्याचे होते. अन्यथ पुन्हा सरकारला विरोधकांच्या टीकेचं धनी व्हायला लागले असते. त्यामुळे सरकारनं पावसाळी अधिवेशनच्या दोन दिवस आधीच खाते वाटप जाहीर केलं.

 

अशी आहेत अन्य मंत्र्यांची खाती :

राधाकृष्ण विखे-पाटील : महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास

गिरीष महाजन : ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे : बंदरे व खनिकर्म

संजय राठोड : अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे : कामगार

संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत : उद्योग,
प्रा.तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार : कृषी

दीपक केसरकर : शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा