29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरविशेषबुजुर्ग क्रीडापटू सिल्व्हेरा आणि सतिंदरपाल वालिया यांना रेल्वेने गौरविले

बुजुर्ग क्रीडापटू सिल्व्हेरा आणि सतिंदरपाल वालिया यांना रेल्वेने गौरविले

Google News Follow

Related

आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी बजावणाऱ्या आणि वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या आपल्या माजी कर्मचाऱ्यांचा भारतीय रेल्वे बोर्डाने देशभरातील विविध विभागीय कार्यालयांमध्ये यथोचित गौरव केला. याच कार्यक्रमांतर्गत विभागीय व्यवस्थापक जी. व्ही.सत्यकुमार यांनी धावपटू ऍलेक्स सिल्व्हेरा आणि हॉकीपटू सतिंदरपाल वालिया या दोन दिग्गजांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून मुंबई सेंट्रल कार्यालयात गौरव केला.

ऍलेक्स सिल्व्हेरा यांनी १९५८ साली टोकियोमध्ये झालेल्या आशियाई खेळामंध्ये ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याआधी १९५६ मध्ये त्यांनी विख्यात धावपटू मिल्खासिंग यांना एका शर्यतीत पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. मात्र त्यांची १९५६ आणि १९६० सालच्या मेलबर्न आणि रोम ऑलिम्पिकमध्ये देशासाठी खेळण्याची संधी थोडक्यात हुकली. १९६० साली ते पात्र देखील ठरले होते पण शेवटी त्यांचे विमान चुकले. सिल्व्हेरा (८९) यांनी १९५८ सालच्या कार्डिफमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले. ती त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेवटची स्पर्धा ठरली.

हे ही वाचा:

वांद्रे येथे गोळीबार करणाऱ्याला केली अटक

फिफाने केले भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे कोरडे, रुक्ष ध्वजारोहण

जन्मठेपेच्या कैद्याला पोलिसांनी दिली ‘मधली सुट्टी’

 

सतिंदरपाल वालिया हे मूळचे पुण्याचे. हॉकी आणि फुटबॉल खेळणाऱ्या वालिया यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले. मात्र त्यांना देखील ऑलिम्पिकचे स्वप्न साकार न झाल्याने पदरी निराशा पडली. १९६८ चे मेक्सिको ऑलिम्पिक आणि १९७० चे बँकॉक आशियाई खेळांसाठी ते राखीव गोलरक्षक होते. मैदानावर आपल्याच एका खेळाडूबरोबर झालेल्या अपघातात त्यांचा हात मोडल्याने त्यांची खेळातील भूमिका बदलली. ते मग प्रशिक्षक आणि पंच बनले. पश्चिम रेल्वे, भारतीय रेल्वेच्या महिला हॉकी संघाची स्थापना आणि प्रगती यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांना आंतरराष्ट्रीय पंच म्हणून ग्रेड वन दर्जा प्राप्त हायोता. त्यांनी भारतीय हॉकी संघाचे अनेक वर्षे प्रशिक्षकपद सांभाळले.या काळात केरळ, हरयाणा, मणिपूर आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांतून प्रतिभेचा शोध घेत अनेक महिला खेळाडूंवर त्यांनी संस्कार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले. त्यांना महाराष्ट्र राज्याचा दादोजी कोंडदेव प्रशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा