29.1 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरक्राईमनामा२६/११ प्रमाणे सोमालियात हॉटेलात घुसले अतिरेकी

२६/११ प्रमाणे सोमालियात हॉटेलात घुसले अतिरेकी

सोमालियातील एका हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला असून हा हल्ला मुंबई २६/११ च्या हल्ल्यासारखा असल्याची माहिती समोर आली आहे.

Google News Follow

Related

सोमालियातील एका हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला असून हा हल्ला मुंबई २६/११ च्या हल्ल्यासारखा असल्याची माहिती समोर आली आहे. अल-शबाब (Al-Shabaab) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले आहेत.

सोमालियाची राजधानी असलेल्या मोगादिशू येथील एका हॉटेलवर अल-शबाब या दहशतवादी गटाच्या दहशतवाद्यांनी एका हॉटेलवर हल्ला केला. दोन कारचा स्फोटदेखील झाला आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अल-कायद्याशी (Al-Qaeda) संलग्न असलेल्या अल- शबाब या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुंबईत झालेल्या २६/११ प्रमाणे हा हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रूमला ‘हा’ धमकीचा मेसेज, यंत्रणा अलर्टवर

१४ तास तपास; सिसोदियांना अटक होणार?

कंबोज यांच्यानंतर आता निंबाळकरांचा ईडीस्फोट

निर्बंधमुक्त दहीहंडीमुळे गोविंदा घेतायत मोकळा श्वास

अल-शबाब हा अल-कायदाशी संबंधित असा एक दहशतवादी गट आहे. अल-शबाब १० वर्षांहून अधिक काळ सोमाली सरकार पाडण्यासाठी लढा देत आहे, अशी माहिती अल जझीराने दिली आहे. अल-शबाब या संघटनेने यापूर्वीही अशाच प्रकारच्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. ऑगस्ट २०२० मध्ये, मोगादिशूमध्ये एका हॉटेलमध्ये हल्ला झाला होता. त्यावेळी साधारण १६ लोक मारले गेले होते. या हल्ल्याची जबाबदारी अल- शबाबने घेतली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा